शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. अध्यक्षांचा ‘रॉबिनहूड’ स्टाईल दणका

By admin | Updated: January 8, 2015 22:54 IST

गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष परशुराम उर्फ प्रशांत कुत्तरमारे सध्या जिल्ह्यात रॉबिनहूड बनले आहेत. त्यांनी दुर्गम व अतिदुर्गम भागात गुप्त दौरे सुरू केले असून या दौऱ्यांच्यानिमित्ताने जि.प.

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष परशुराम उर्फ प्रशांत कुत्तरमारे सध्या जिल्ह्यात रॉबिनहूड बनले आहेत. त्यांनी दुर्गम व अतिदुर्गम भागात गुप्त दौरे सुरू केले असून या दौऱ्यांच्यानिमित्ताने जि.प. अंतर्गत येणाऱ्या विविध विभागातील तालुका व गावपातळीवरच्या कार्यालयातील अनागोंदी प्रकर्षाने समोर आली आहे. त्यामुळे अध्यक्षांचा दणका साऱ्या प्रशासकीय व्यवस्थेत चर्चेचा विषय ठरला आहे. २१ मार्च रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर विराजमान झाल्यानंतर आचारसंहितेत बराच कालावधी निघून गेला. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांनी आपल्या कामाला झंझावती सुरूवात केली आहे. मुलचेरा तालुक्यातून जिल्हा परिषदेवर निवडून आलेल्या कुत्तरमारे यांचा अहेरीत मुक्काम असतो. त्यामुळे त्यांनी अहेरी उपविभागातील मुलचेरा, भामरागड, एटापल्ली या तालुक्यांना भेटी देण्यासाठी गोपनिय दौरे सुरू केले आहेत. त्या माध्यमातून त्यांनी एटापल्ली, भामरागड पंचायत समितीला भेट दिली. यावेळी त्यांना अनेक विभागप्रमुख व कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले. एक नव्हे तर दोन-दोन दिवस अधिकारी विनाअर्ज कार्यालयात अनुपस्थित राहतात, हेही चित्र ‘याच देही याची डोळा’ अध्यक्षांनी अनुभवले. आरोग्य व शिक्षण हे दोन विभाग जिल्हा परिषदेत नेहमी वादग्रस्त राहिले आहेत. या विभागातील कर्मचारी मुख्यालयी राहत नाही, अशा तक्रारी असतात. मुख्यालयी हजर न राहता, शेजारच्या मोठ्या गावातून ये-जा करणारे वेळेवर कार्यालयात पोहोचत नाही, असे अध्यक्षांनी शाळांना भेटी दिल्यावर दिसून आले. जिल्हा परिषदेच्या दुर्गम भागातील शाळेवर केवळ सहा विद्यार्थ्यांकरीता दोन शिक्षक उपलब्ध करण्यात आले आहेत. पहिला चार दिवस आणि दुसरा चार दिवस शाळेत उपस्थित राहत असतो, असे अनेक नमुनेदार उदाहरणे अध्यक्षांनी गेल्या सात-आठ महिन्यांत अनुभवले आहे.मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली, सुंदरनगर, अहेरी तालुक्यातील महागाव, भामरागड तालुक्यात आरेवाडा आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना भेटी दिल्या. येथेही अनेक कर्मचारी, डॉक्टर हजर नसल्याचे अध्यक्षांच्या निदर्शनास आले. एटापल्ली पंचायत समितीला भेट दिल्यावर प्रत्यक्ष कर्मचारी दिसून आले नाहीत. त्यांनी लगेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याची माहिती दिली व या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे सांगितले. त्या सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याची कारवाई करण्यात येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)