शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

येवलीत वाद चव्हाट्यावर

By admin | Updated: December 23, 2015 02:04 IST

खा. अशोक नेते यांनी खासग्राम म्हणून दत्तक घेतलेल्या येवली गावात ग्रामसचिवालयालगत संरक्षण भिंत व सौंदर्यीकरणाच्या कामाच्या ठिकाणी ...

गडचिरोली : खा. अशोक नेते यांनी खासग्राम म्हणून दत्तक घेतलेल्या येवली गावात ग्रामसचिवालयालगत संरक्षण भिंत व सौंदर्यीकरणाच्या कामाच्या ठिकाणी कामाचे कंत्राट घेतलेल्या ग्राम पंचायतीच्या एका सदस्याने पशुवैद्यकीय परिचर निवासस्थानाचे बांधकाम सुरू केल्यामुळे येथे प्रचंड वाद उफाळला आहे. या संदर्भात येवलीच्या ग्रामस्थांनी आपल्या स्वाक्षरीनिशी जिल्हाधिकारी यांच्याकडे मंगळवारी लेखी निवेदन देऊन तक्रार केली आहे. येवली आदर्श सांसद ग्राम कमिटीच्या अनेक बैठका पार पडल्या यात ग्राम विकासाच्या अनेक योजना आखण्यात आल्या असून विकासाचा सुक्ष्म आराखडा तयार करण्यात आला आहे. ग्राम पंचायतीशी समन्वय साधून ग्राम विकासाच्या योजना कार्यान्वित होत असताना येवली येथे सचिवालय परिसरात संरक्षण भिंत व सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. दरम्यान ग्राम पंचायतीच्या एका सदस्याने याच जागेवर पशुवैद्यकीय परिचर निवासस्थानाचे बांधकाम सुरू केले आहे. या निवासस्थानाच्या बांधकामास ग्रामस्थांनी विरोध दर्शवून या संदर्भाची तक्रार संवर्ग विकास अधिकारी पचारे यांच्याकडे केली आहे. परिचर निवासस्थानाचे बांधकाम ग्राम सचिवालय परिसरात न करता इतर दुसऱ्या ठिकाणच्या जागेवर बांधकाम करण्याचे निर्देश बीडीओंनी दिले. त्यानंतर परिचर निवासस्थानाचे बांधकाम बंद करण्यात आले. प्रशासनाने कारवाई केल्यानंतरही या कामाचे कंत्राट घेतलेल्या एका ग्राम पंचायत सदस्याने मनमानी करीत पुन्हा याच जागेवर परिचर निवासस्थानाचे खोदकाम सुरू केले. ग्राम पंचायतीच्या इतर सदस्यांचा या ठिकाणी होत असलेल्या परिचर निवासस्थानाच्या बांधकामास विरोध आहे. मात्र ग्रामस्थ, ग्रा. पं. चे इतर सदस्य यांची कोणतीही सूचना लक्षात न घेता, कंत्राटदार असलेल्या त्या ग्रा. पं. सदस्याने मनमर्जीने १३ डिसेंबरपासून परिचर निवासस्थानाचे बांधकाम सुरू केले आहे. या कंत्राटदार असलेल्या ग्रा. पं. सदस्याच्या बांधकामास येवली ग्राम पंचायतीच्या सरपंचाचा अप्रत्यक्षरित्या पाठिंबा असल्याचे ग्रामस्थांनी तक्रारीत नमुद केले आहे. जिल्हाधिकारी व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तत्काळ मोका चौकशी करून परिचर निवासस्थानाचे बांधकाम थांबवावे, जेणेकरून येथे ग्रामसचिवालयाची संरक्षण भिंत व सौंदर्यीकरणाचे काम करता येईल. तसेच ग्राम पंचायत प्रशासन व ग्रामस्थांमधील वाद संपुष्ठात येईल, असेही ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.