शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
3
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
4
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
5
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
6
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
7
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
8
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
9
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
10
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
11
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
12
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
13
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
14
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
15
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
18
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
20
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

येर्रावागूच्या पुलाचे काम रखडले

By admin | Updated: July 9, 2015 01:45 IST

मागील दोन-तीन वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात थातुरमातूर दुरूस्ती करण्यात येणारा येर्रावागू पुलाचे काम पुन्हा रखडले आहे.

नागरिकांना फटका : जीवनावश्यक वस्तूंच्या भावावर झाला परिणाम
श्रीकांत सुगरवार आसरअल्ली
मागील दोन-तीन वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात थातुरमातूर दुरूस्ती करण्यात येणारा येर्रावागू पुलाचे काम पुन्हा रखडले आहे. त्यामुळे ५० ते ५५ गावांच्या दळणवळणावर परिणाम झाला असून पूल नसल्याने जीवनावश्यक वस्तूंचे भाव या गावांमध्ये दुपटीने वाढले आहे. जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी पुलाअभावी लांबूनच्या भागातून यावे लागत असल्याने वाहतुकीचा खर्च वाढला आहे. याचा थेट आर्थिक फटका नागरिकाच्या खिशावर पडत आहे.
राज्य परिवहन महामंडळाने आसरअल्लीकडे येणारी बससेवा येर्रावागू नाल्यावरचा पूल नादुरूस्त असल्याने बंद केली आहे. त्यामुळे खासगी वाहनांना सुगीचे दिवस आले आहेत. एका प्रवाशाकडून दुप्पट ते तिप्पट रक्कम प्रवासी भाड्याच्या नावाखाली वसूल केली जात आहे. २० ते २२ प्रवासी एकाच वाहनात कोंबून भरले जात आहे. दररोज गरज असणारा भाजीपाला, डाळ, तांदूळ, तेल नागरिकांना विकत घेण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहे. शाळकरी लहान मुलांनाही नाल्यामध्ये पायी जाऊन पाण्यातून वाट काढावी लागत आहे.
पावसाळ्याच्या काळात पूर आल्यास पुरातून वाट काढणे विद्यार्थ्यांना कठिण होणार आहे. शेतीचा हंगाम सुरू झाला असून शेती अवजारे व साहित्यही पूल नसल्यामुळे इतर मार्गाने आणावे लागते. त्यामुळे या साहित्याच्या किंमतीही वाढविण्यात आल्या आहेत. स्थानिक व्यावसायिक मालामाल असले तरी नागरिकांना मात्र चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. या पुलाची गतवर्षी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी पाहणी केली होती. आता पूल दुरूस्तीच्या कामासाठी त्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
सीमावर्ती भागातील गावांना फटका
तेलंगणा राज्याच्या सीमेवर सिरोंचा तालुक्यात आसरअल्ली परिसरात येणाऱ्या ५० ते ५५ गावांना येर्रावागू नाल्यावरचा पूल वाहून गेल्याने थेट फटका बसतो. राज्य परिवहन महामंडळ आपली बससेवा तत्काळ बंद करून देते. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतुकीची वाहने नागरिकांची मनमानी लूट करतात. प्रवासासाठीही अतिरिक्त पैसे प्रवाशांना मोजावे लागतात. यामुळे महामंडळाचे नुकसानही होते.