६७ लाखांनी फसवणूक करून महिला पतसंस्थेचा एजंट पसार; दहा खातेदारांची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 02:14 PM2023-02-22T14:14:08+5:302023-02-22T14:18:07+5:30

गडचिराेली पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल

women's credit institution agent committed fraud of 67 lakh at gadchiroli, 10 account holders filed Complaint | ६७ लाखांनी फसवणूक करून महिला पतसंस्थेचा एजंट पसार; दहा खातेदारांची तक्रार

६७ लाखांनी फसवणूक करून महिला पतसंस्थेचा एजंट पसार; दहा खातेदारांची तक्रार

googlenewsNext

गडचिराेली : येथील विजया महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या मंगेश महादेव नरड या एजंटने नवेगाव येथील जवळपास १० कुटुंबांची ६७ लाख रुपयांनी फसवणूक केली. त्याच्या विराेधात गडचिराेली पाेलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती खातेदारांनी पत्रकार परिषदेत दिली.

विजया महिला नागरी सहकारी पतसंस्थेची नवेगाव येथे शाखा आहे. या शाखेत मंगेश हा एजंट व व्यवस्थापकसुद्धा हाेता. मंगेश हा मागील अनेक वर्षांपासून नवेगाव येथील नागरिकांच्या संपर्कात हाेता. येथील काही नागरिकांच्या जमिनी लाखाे रुपये किमतीने घर बांधकामासाठी विकण्यात आल्या. या ग्राहकांना मंगेशने हेरून आपल्या पतसंस्थेत जास्त दराने व्याज मिळते, असे सांगून लाेकांकडून रक्कम घेतली.

जवळपास १० नागरिकांनी आरडी, फिक्स डिपाॅझिटच्या माध्यमातून ६७ लाख रुपयांची रक्कम २०२०मध्ये मंगेशकडे दिली. मात्र, मंगेशने सदर पैसे पतसंस्थेत जमा केले नाहीत. ज्यांनी फिक्स डिपाॅझिट केले. त्यांना स्केचपेनने लिहिलेला साधा कागद दिला. पैशांची गरज पडली असता काही नागरिक पतसंस्थेत गेले असता पतसंस्थेमध्ये पैशांची नाेंदच नसल्याचे दिसून आले. याबाबत गडचिराेली पाेलिस स्टेशनमध्ये २० फेब्रुवारी राेजी खातेदारांनी तक्रार केली असता, मंगेशच्या विराेधात भादंवि ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्रकार परिषदेला पूजा पडिहार, लीला पडिहार, लखन पडिहार, वनीता पडिहार, वंदना देवडे, गाैरव पडिहार, वंदना देवडे, गाैरव पडिहार, साहेबराव पडिवार आदी उपस्थित हाेते.

Web Title: women's credit institution agent committed fraud of 67 lakh at gadchiroli, 10 account holders filed Complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.