गडचिरोलीत वीज पडून एक महिला ठार, नऊ मजूर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 17:26 IST2020-08-01T17:25:44+5:302020-08-01T17:26:32+5:30
कापसाच्या पिकाला खत देण्यासाठी गेलेल्या महिला मजुरांवर वीज कोसळल्याने एक महिला जागीच ठार झाली तर नऊ महिला जखमी झाल्या. ही घटना शनिवारी दुपारी २.३० वाजता अहेरी तालुक्यातील चिंचगुंडी येथे घडली.

गडचिरोलीत वीज पडून एक महिला ठार, नऊ मजूर जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कापसाच्या पिकाला खत देण्यासाठी गेलेल्या महिला मजुरांवर वीज कोसळल्याने एक महिला जागीच ठार झाली तर नऊ महिला जखमी झाल्या. ही घटना शनिवारी दुपारी २.३० वाजता अहेरी तालुक्यातील चिंचगुंडी येथे घडली.
पोसक्का चिन्ना तोटावार (३५) रा. चिंचगुंडी असे मृत महिलेचे नाव आहे. जखमींमध्ये अरविंद मल्लेश गुम्पा (८), लक्ष्मी मलेश गुम्पा (४०) दोघेही रा. रेगुंटा, गणपत नागना कुमराम (३८), सारका लचमा पानेम (१५), नागुबाई बापू पानेम (२२), वैशाली लिंगा तोटावार (१८), सुनिता श्रीकांत टेकुलवार (२५), स्नेहा शंकर पानेम (१७), मेलेश्वरी शंकर पानेम (३५) सर्व रा. चिंचगुंडी अशी जखमींची नावे आहेत.
दुपारच्या जेवनासाठी सर्व मजूर शेतातीलच आंब्याच्या झाडाखाली बसले होते. दरम्यान मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात होऊन झाडावर वीज कोसळली. यात पोसक्का ही जागीच ठार झाली, तर इतर मजूरही जखमी झाले. जखमींना अहेरी उपजिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. डॉ.चेतन इंगोले व डॉ.रविंद्र वाठोरे हे जखमींवर उपचार करीत आहेत.