महिला शिपायाची विष घेऊन आत्महत्या, गडचिरोली पोलीस वसाहतीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2022 19:02 IST2022-01-30T15:56:51+5:302022-01-30T19:02:58+5:30
गडचिरोली पोलीस वसाहतीत एका महिला शिपायाने पतीशी झालेल्या वादानंतर विष प्राशन करून आत्महत्या केली.

महिला शिपायाची विष घेऊन आत्महत्या, गडचिरोली पोलीस वसाहतीतील घटना
गडचिरोली : पतीशी झालेल्या वाद विकोपाला गेल्यानं एका महिला पोलीस शिपायाने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास गडचिरोली पोलीस वसाहतीत घडली.
प्रणाली काटकर (वय ३५) असे मृत महिला पोलीस शिपायाचे नाव आहे. त्या दोन वर्षांपासून गडचिरोली मुख्यालयात कार्यरत होत्या. त्यांचे दोन वर्षांपूर्वीच पोलीस शिपाई संदीप पराते यांच्याशी लग्न झाले होते.
प्रणाली या संदीपच्या दुसऱ्या पत्नी होत्या. लग्नाला दोन वर्ष झाली मात्र, त्यांच्यात नेहमी खटके उडायचे. शनिवारीही त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. वाद विकोुाला गेल्यानं प्रणालीने विष प्राषण केले. सदर बाब लक्षात येताच संदीप यांनी प्रणालीला सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पुढील तपास सुरू आहे.