वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, वनविकास महामंडळाच्या पोर्ला वनातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 17:18 IST2021-11-23T15:34:18+5:302021-11-23T17:18:03+5:30
जंगलात केरसुणीसाठी लागणारे गवत आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला चढवून ठार केले. ही घटना आज सकाळी ११:३० च्या सुमारास वनविकास महामंडळाच्या कक्ष क्र. २ मधे घडली.

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, वनविकास महामंडळाच्या पोर्ला वनातील घटना
गडचिरोली : जिल्ह्यातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. आज जंगलात केरसुणीसाठी गवत तोडायला गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले.
ही घटना आज सकाळ ११:३० च्या सुमारास वनविकास महामंडळाच्या कक्ष क्र. २ मधे घडली. इंदिरा उद्धव आत्राम (वय ६०) असे या महिलेचे नाव आहे. त्या जंगलात केरसूणीसाठी लागणारे गवत आणण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, गेल्या दोन वर्षात वाघाच्या हल्ल्यात जवळपास १५ जणांचा बळी गेला आहे. नुकतीच चामोर्शी तालुक्यात येणाऱ्या कुनघाडा (रै) वनपरिक्षेत्राच्या हद्दीत एका हिम्मतवान महिलेने वाघाशी झुंज दिल्याची घटना समोर आली होती. तर, आज वाघाच्या हल्ल्याची आणखी एक घटना समोर आली असून यात आणखी एक मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.