शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
5
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
8
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
9
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
10
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
11
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
12
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
13
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
14
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
15
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

लढत रोमांचक : अशोक नेते यांची हॅटट्रिक किरसान रोखणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 12:12 PM

लढत रोमांचक : आदिवासी- ओबीसी मते ठरणार निर्णायक

संजय तिपाले

गडचिरोली : राज्याच्या शेवटच्या टोकावरील गडचिरोली - चिमूर या तीन जिल्ह्यांत विखुरलेल्या लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजप व काँग्रेसमध्ये काट्याची लढत होत आहे. सलग दोनवेळा भाजपकडून दिल्ली गाठणाऱ्या अशोक नेते यांना यंदा हॅटट्रिकची संधी आहे, तर काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत आहेत. बलाढ्य भाजपपुढे लढताना काँग्रेसच्या विजयाचे धनुष्यबाण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना पेलवते का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

आदिवासी-ओबीसीबहुल, माओवादग्रस्त व तेलंगणा, छत्तीसगड सीमेला चिकटून असलेल्या गडचिरोली - चिमूर मतदारसंघात गडचिरोलीतील अहेरी, आरमोरी तसेच गाेंदियातील आमगाव व चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी व चिमूर अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सलग दोन टर्म खासदार, त्याआधी दोन टर्म आमदार यामुळे अशोक नेते यांचा मतदारांशी संपर्क आहे. तसेच  अनुभव देखील गाठीशी आहे, पण त्यांना ‘अँटी इन्कम्बन्सी’चा सामना करावा लागत आहे.

काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान हे नवखे उमेदवार आहेत. भाजपच्या तुलनेत बूथ पातळीवरील यंत्रणेचा अभाव आहे. निवडणुकीपूर्वीच पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर येऊन  त्यातून दोन नेत्यांचे बंड झाले ते रोखण्यात यश आलेले नाही.

मातब्बरांची प्रतिष्ठा लागली पणालागडचिरोलीचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, तर अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे हे होमपीच आहे, त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. उमेदवारीवरुन प्रतिभा धानोरकरांशी विसंवाद झाल्याने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरऐवजी गडचिरोली- चिमूरमध्ये जादा लक्ष घातले आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

चामोर्शी तालुक्यात उद्योगासाठीच्या भू - संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे शेतकरी संतप्त आहेत. भाजपला याचा फटका बसेल, काँग्रेस हा मुद्दा कसा कॅश करतो, हे पहावे लागेल.बेरोजगारी, उच्चशिक्षणाच्या अपुऱ्या सोयी, पायाभूत सुविधांचा अभाव, रेल्वे, रखडलेले रस्ते, पूल बांधकाम व दळणवळणासाठीची परवड हे प्रश्नही ऐरणीवर आहेत. पेसा कायद्याची अमलबजावणी व ओबीसी जनगणना होत नसल्याने नाराजी आहे.

गटा - तटाचा काय होणार परिणाम ?nभाजप व काँग्रेस या दोन पक्षांसह मित्रपक्षांमध्येही बेबनाव आहे . भाजपने सर्व पदाधिकाऱ्यांची मोट बांधली. नाराज असलेले माजी राज्यमंत्री अंबरिशराव आत्राम यांचेही मन वळविले. nमित्रपक्ष राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे सोबत आहेत. मात्र, काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत मतभेद आहेत. इंडिया आघाडी व महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने फारकत घेतल्याने अडचणी वाढल्या आहेत.

 २०१९ मध्ये काय घडले?अशोक नेते    भाजप (विजयी)    ५,१९,९६८ डॉ. नामदेव उसेंडी    काँग्रेस     ४,४२,४४२डॉ. रमेश गजबे    वंचित बहुजन आघाडी    १,११,४६८

 

 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीAshok Neteअशोक नेतेBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Big Bash Leagueबिग बॅश लीग