आकस्मिक मृत्यूनंतर शवविच्छेदन महत्वाचे का?; भावनिक नातेवाईकांनी समजण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 14:04 IST2024-12-12T14:00:06+5:302024-12-12T14:04:25+5:30

यंत्रणेकडून कार्यवाही : शवविच्छेदन अहवालातून कळते मृत्यूचे कारण

Why is autopsy important after sudden death?; Need to be understood by emotional relatives | आकस्मिक मृत्यूनंतर शवविच्छेदन महत्वाचे का?; भावनिक नातेवाईकांनी समजण्याची गरज

Why is autopsy important after sudden death?; Need to be understood by emotional relatives

लोकमत न्यूज नेटवर्क 
गडचिरोली :
कुठलेही मोठे आजार नाही, प्रकृती एकदम ठणठणीत असताना एखाद्या व्यक्तीचा किंवा महिलेचा आकस्मिक मृत्यू झाल्यास संबंधिताच्या मृत्यूचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी पोलिस व आरोग्य विभागाच्या वतीने मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची कार्यवाही पार पाडली जाते.


येथील जिल्हा सामान्य रुग्णालय अधिनस्त असलेल्या शवविच्छेदन गृहात महिन्यातून जवळपास २२ ते २५ दिवस कोणत्या नाही कोणत्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाते. यासाठी आवश्यक ती कार्यवाही यंत्रणेकडून पार पाडली जाते.


पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट म्हणजे काय?
संबंधित व्यक्तीचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, याचा शोध घेण्यासाठी केली जाणारी प्रक्रिया म्हणजे पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट होय.


...तर गुन्हा पचवला जाऊ शकतो 
आकस्मिक निधन झालेल्या व्यक्तीचे शव- विच्छेदन न केल्यास मृत्यूचे नेमके कारण कळणार नाही. परिणामी संबंधित आरोपीचा गुन्हा पचविला जाऊ शकतो.


'पोस्ट मॉर्टेम' मुळेच क्लिष्ट गुन्ह्यांची उकल
शवविच्छेदन अहवालातून मृतक व्यक्तीची हत्या व इतर क्लिष्ट गुन्ह्यांची उकल पोलिसांना करता येते. नेमका मृत्यू कशामुळे झाला, किती वाजता झाला, कुठे, किती घाव झाले हे यातून कळत असते.


दिवसाला तीन ते चार मृतदेहांचे शवविच्छेदन
विष प्राशन करून आत्महत्या, अपघाती निधन व इतर कारणांनी अचानक मृत्यू झालेल्या व्यक्तींचे शवविच्छेदन केले जाते. गडचिरोली येथील शवविच्छेदन गृहात दिवसाला तीन ते चार जणांचे शव- विच्छेदन केले जाते.


पोस्टमॉर्टेम कधी केले जाते?
सर्पदंशाने मृत्यू, वाघाच्या हल्ल्यात मृत्यू, अपघातात गंभीर जखमी होऊन मृत्यू, आकस्मिक मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीचे शववि- च्छेदन केले जाते. यासाठी कुटुंबियांची परवानगी घेतली जाते.


शवविच्छेदन अहवाल यासाठी महत्त्वाचा 
गुन्हेगारीतून हत्या झाली असल्यास आरोपीचा शोध लागावा, विम्याच्या पैशाचा लाभ मिळावा, यासाठी शवविच्छेदन अहवाल संबंधित कुटुंबिय व प्रशासनाला आवश्यक असतो.


नातेवाईक भावनिक होतात 
जवळच्या व्यक्तीचे व नातेवाईकाचा मृत्यू झाल्यास शववि- च्छेदन करताना नातेवाईक प्रचंड भावनिक होतात. पार्थिव शरीराची चिरफाड करू नये, अशा त्यांच्या भावना असतात. 


११ महिन्यांत २६५ शवविच्छेदन 
येथील शवविच्छेदनगृहात गेल्या ११ महिन्यांत जवळपास २६५ व्यक्तींचे शवविच्छेदन करण्यात आले. याबाबतचा अहवाल संबंधित डॉक्टरांनी पोलिस विभागाकडे सुपूर्द केला आहे.


 

Web Title: Why is autopsy important after sudden death?; Need to be understood by emotional relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.