बाॅक्स .....
कारवाई हाेत नसल्याने नियम ताेडण्याचे प्रकार वाढले
निर्बंध माेडणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे. सुरुवातीला नगर परिषदेचे पथक फिरून सुरू राहत असलेल्या दुकानांवर कारवाई करीत हाेते. आता मात्र पथकामार्फत कारवाई केली जात नसल्याने दुकानदारांची हिंमत वाढली आहे. एकाला बघून दुसरा दुकानदार सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवत आहेत. ५ वाजेपर्यंत तर सर्वच दुकाने नियम ताेडून सुरू राहतात.
बाॅक्स .....
रात्री ११ वाजेपर्यंत हाॅटेलमध्ये ग्राहकांची रेलचेल
सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांना बसवून सेवा देण्याची मुभा हाॅटेल मालकांना देण्यात आली आहे. ४ वाजतानंतर केवळ पार्सलसेवा द्यायची आहे. मात्र, शहरातील हाॅटेल रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहतात. हाॅटेलमध्येच जेवणाची व्यवस्था केली जाते. जिल्हाधिकाऱ्यांचे नियम हाॅटेल मालकांकडून पूर्णपणे धाब्यावर बसविले जात आहेत. हा अतिशय गंभीर प्रकार आहे.
बाॅक्स ....
दुकानाबाहेर राहताे कामगार
लाेकमत प्रतिनिधीला मुख्य मार्केटमधील एक कापड दुकान अर्धवट शटर टाकलेल्या अवस्थेत दिसून आले. बाहेर असलेल्या कामगाराला दुकान सुरू आहे काय? आपल्याला कपडे घ्यायचे आहेत असे विचारले असता, कामगाराने दुकान सुरू असल्याचे सांगितले. शटर उघडून दुकानात प्रवेश करून काही ग्राहक दुकानामध्ये कपडे खरेदी करीत असल्याचे दिसून आले.