शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दुसागुडातील विहिरींनी तळ गाठला

By admin | Updated: April 29, 2016 01:39 IST

तालुक्यातील दुसागुडा येथील तीन विहिरींच्या पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात खालावली असून त्या कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत.

हातपंप नादुरूस्त : गावात पाण्याची टंचाई, पंचायत समिती प्रशासनाचे दुर्लक्षएटापल्ली : तालुक्यातील दुसागुडा येथील तीन विहिरींच्या पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात खालावली असून त्या कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. तर तीन पैकी एक हातपंप पूर्णपणे बंद आहे. दोन हातपंपामधूनही पाहिजे त्या प्रमाणात पाणी निघत नसल्याने या गावातील नागरिकांना पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. एटापल्ली तालुक्यातील हेडरी, परसलगोंदी, जांभिया, मवेली, कुदरी, रेकनार, कसानसूर, घोटसूर व दुसागुडा या गावांमध्ये उन्हाळ्यामध्ये दरवर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यातील दुसागुडा हे जवळपास ७०० लोकसंख्या असलेले गाव आहे. या गावांमध्ये तीन विहिरी आहेत. मात्र या तिन्ही विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्या कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. एक हातपंप बंद आहे. दोन हातपंपातून अत्यंत कमी पाणी येते. एक बकेट पाणी काढण्यासाठी १५ ते २० मिनीट हातपंप हलवावे लागते. हातपंप दुरूस्त करण्याबाबत पंचायत समितीकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र पंचायत समिती प्रशासनाचे सदर हातपंप दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. विहिरीतील गाळ उपसल्यास पाण्याची पातळी वाढू शकते. गाळ उपसणेही ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र ग्रामपंचायतीनेही याकडे दुर्लक्ष केले आहे. सोमा पदा, चंद्रा चंदू पोटावी, मागरू रैनू पोटावी, सादू नरोटे यांनी हातपंप दुरूस्तीची मागणी केली आहे.दुर्गम भागातील गावांकडे प्रशासनाचे दुर्लक्षएटापल्ली तालुक्यातील बहुतांश गावे दुर्गम भागातील आहेत. या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे. मात्र या गावांकडे प्रशासातील अधिकारी लक्ष देत नाही. गावातील नागरिकही याबाबतची तक्रार पंचायत समिती प्रशासनाकडे करीत नाही. त्यामुळे या गावांमध्ये असलेली पाणीटंचाई लक्षात येत नसली तरी पाणीटंचाई गंभीर आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणेला कामाला लावणे अत्यंत आवश्यक झाले आहे. दुसागुडा येथील हातपंपावर सकाळपासूनच महिलांची गर्दी जमण्यास सुरुवात होते. ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा मे महिन्यात पाणीटंचाईची समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली.