शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
3
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
4
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
5
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
6
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
7
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
8
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
9
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
10
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
11
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
12
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
13
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
14
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
15
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
16
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
17
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
18
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
19
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
20
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला

'आम्हाला 'त्या' शाळेत जायचे नाही.. ' एका घटनेने गडचिरोलीतील दहा मुलींचे भविष्य धोक्यात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 20:19 IST

Gadchiroli : नावाला नामांकित, प्रत्यक्षात असुरक्षित; आदिवासी विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी मुलींना दर्जेदार सुविधांसह शिक्षण घेता यावे यासाठी नामांकित शाळा प्रवेश योजना राबविली जाते, पण प्रत्यक्षात या शाळा किती सुरक्षित, असा प्रश्न नागपूरच्या रामटेकमधील शीतलवाडीतील ज्ञानदीप कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेजात घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे निर्माण झाला आहे.

या शाळेत गडचिरोलीच्या प्रकल्प कार्यालयांतर्गत दहा मुलींचे प्रवेश झालेले असून शाळेतील अन्य एका विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण झाल्याच्या घटनेपासून गडचिरोलीच्या मुलींमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांना शाळा बदलून हवी आहे, पण आदिवासी विकास विभागाने दिल्याने तिढा निर्माण नकार झाला आहे. 

मुलींचे समायोजन अन् सुरक्षेचे ऑडिट करावे

आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नासेर हाश्मी यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव अमृत मेहर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या विद्यालयात शिकणाऱ्या आदिवासी मुलींसह २९ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपली व्यथा मांडली. शाळा प्रशासनावर कारवाई करावी, विद्यार्थी सुरक्षेची पडताळणी करावी, १० आदिवासी मुलींचे सुरक्षित शाळेत तत्काळ समायोजन करावे आदी मागण्या करण्यात आल्या.

सहपालकमंत्र्यांची काहीच जबाबदारी नाही का?

अत्याचाराचे प्रकरण घडल्याने जिल्ह्यातील दहा आदिवासी मुलींमध्ये भीतीचे वातावरण आहे. महिनाभरापासून त्या शाळेत जात नाहीत, परिणामी शैक्षणिक नुकसान होत आहे. सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांच्याच क्षेत्रात आदिवासी मुली सुरक्षित नाहीत, हा प्रश्न सोडविण्यासाठी ते का पुढाकार घेत नाहीत, असा प्रश्न 'आप'चे जिल्हाध्यक्ष नासेर हाश्मी यांनी केला.

"ही घटना अतिशय घृणास्पद आहे. १० मुलींच्या समायोजनाबाबत शासनाला विनंती केली होती. मात्र, तशी तरतूद नसल्याने अडचण आहे. विद्यार्थिनींना सुरक्षा पुरविण्यासाठी सर्वतोपरी उपाय सुरू आहेत."- आयुषी सिंह, अतिरिक्त आयुक्त, एकात्मिक आदिवासी विभाग, नागपूर.

English
हिंदी सारांश
Web Title : Gadchiroli girls' future jeopardized after abuse incident; refuse to attend school.

Web Summary : Following a sexual abuse incident at a Ramtek school, ten Gadchiroli girls fear returning. Despite requests for school transfers, the tribal development department has denied them. AAP demands action, security audits, and immediate placement in safe schools.
टॅग्स :GadchiroliगडचिरोलीnagpurनागपूरSexual abuseलैंगिक शोषणSchoolशाळाEducationशिक्षण