पाणीबाणी अटळ, २५ टक्केच साठा; दिना धरणातील पातळीत झपाट्याने घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 14:51 IST2025-02-15T14:50:13+5:302025-02-15T14:51:15+5:30

Gadchiroli : जलसंकट उभे ठाकण्याचा धोका; तलावही कोरडे

Water crisis inevitable, only 25 percent stock; Level in Dina Dam drops rapidly | पाणीबाणी अटळ, २५ टक्केच साठा; दिना धरणातील पातळीत झपाट्याने घट

Water crisis inevitable, only 25 percent stock; Level in Dina Dam drops rapidly

गोपाल लाजूरकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे. त्यानुसार जलस्त्रोत झपाट्याने घटत आहेत. जिल्ह्यातील प्रमुख जलस्रोतांमधील जलपातळी कमी होत आहे. विशेष म्हणजे, दीड महिन्यापूर्वी जिल्ह्यात ३९.९६९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. आता यात १४ टक्क्यांनी घट झालेली असून सध्या २५.३६ टक्केच पाणीसाठी प्रमुख सिंचन प्रकल्पामध्ये शिल्लक आहे. भर उन्हाळ्यात जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता आहे.


मागील वर्षी परतीच्या पावसामुळे जलस्त्रोतांमध्ये बऱ्यापैकी पाणी साचले. शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठड़ी तलाव, बोड्या व प्रकल्पांमधील पाण्याची गरज भासली नाही. सध्या तीव्र पाणीटंचाईची समस्या उ‌द्भवलेली नसली तरी उन्हाळ्याच्या दिवसांत जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जलस्त्रोत व प्रकल्पांतील पाणीसाठा जपून वापरणे हाच पर्याय आहे.


आरमोरी तालुक्यातील कोसरी लघु प्रकल्पात सध्या ८४.१७ टक्के पाणीसाठा आहे. येंगलखेडा लघु प्रकल्पातही ६१.११ टक्के पाणी आहे. सदर प्रकल्पातील पाणी परिसराच्या गावांतील नळ योजनांच्या विहिरींची पाणी पातळी वाढवू शकतात.


५७.७६ टक्के पाणीसाठा उरला मामा तलावांत
जिल्ह्यात पाटबंधारे विभागांतर्गत मोठे १५ माजी मालगुजारी तलाव आहेत, तर ९ लघु प्रकल्प आहेत. यापैकी माजी माजगुजारी तलावांमध्ये ५७.७६ टक्के पाणीसाठा आहे. मामा तलावांमध्ये असलेला पाणीसाठा संबंधित गावांच्या जलस्त्रोतातील पाणी पातळी कायम राखण्यासाठी मदत करू शकतात.


पेंटिपाका, अमराजी प्रकल्प कोरडा होणार
जिल्ह्यात २ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. लघु प्रकल्पांतील पाणी साठ्याची सरासरी ३८.३० टक्के आहे. विशेष म्हणजे, सिरोंचा तालुक्यातील अमराजी लघु प्रकल्पात २.१६ तर पेंटिपाका लघु प्रकल्पात सध्या २.४६ टक्केच पाणी साठा आहे. उन्हाळ्यात हे प्रकल्प कोरडे होऊ शकतात.


२६ प्रकल्प सिरोंचा तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा
जिल्ह्यात आहेत. पाटबंधारे विभागांतर्गत मोठा एक प्रकल्प, मध्यम एक, लघु तलाव (प्रकल्प) ९ तर माजी मालगुजारी तलाव १५ आहेत.


प्रकल्प                  पाणीसाठा
दिना                       १२.८२%
चिचडोह बॅरेज          २९.८९%
येंगलखेडा प्रकल्प    ६१.११%
कोसरी प्रकल्प        ८४.१७%


रेगडी परिसरातील पाणी पुरवठा योजना प्रभावित
चामोर्शी तालुक्याच्या रेगडी येथील दिना नदीवर बांधलेल्या दिना प्रकल्पात सध्या १२.८२ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळ्यात या प्रकल्पाचे पाणी धान पिकासाठी सोडण्यात आले होते. सदर प्रकल्पाच्या परिसरातील नळ योजनांच्या विहिरी कोरड्या पडू शकतात. रेगडी परिसरातील दिना धरणालगतच्या पाणी योजना प्रभावित होऊ शकतात.


 

Web Title: Water crisis inevitable, only 25 percent stock; Level in Dina Dam drops rapidly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.