रस्त्याचे काम न करण्याचा इशारा; नक्षलवाद्यांनी चिठ्ठी फेकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 18:13 IST2020-03-07T18:11:52+5:302020-03-07T18:13:46+5:30
तीन महिन्यापूर्वी येथील प्रसिद्ध हत्ती कॅम्पमध्ये नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालून तोडफोड केली होती.

रस्त्याचे काम न करण्याचा इशारा; नक्षलवाद्यांनी चिठ्ठी फेकली
कमलापूर (गडचिरोली) : अहेरी तालुक्यातील कमलापूर ते दामरंचा या मार्गावरील रस्त्याचे काम बंद करण्यासाठी नक्षलवाद्यांनी पत्रके टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून २३ किलोमीटर मार्गाचे काम सुरू आहे. पण हे काम बंद करण्याचा इशारा देऊन नक्षल्यांकडून आडकाठी आणली जात आहे.
तीन महिन्यापूर्वी येथील प्रसिद्ध हत्ती कॅम्पमध्ये नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालून तोडफोड केली होती. त्यानंतर पुन्हा आता नक्षलवाद्यांनी कमलापूर भागात आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पत्रकात तीन लोकांची नावेही आहेत. त्यामुळे दहशतीचे वातावरण पसरले आहे. अशा पत्रकातून नक्षलवाद्यांकडून विकास कामांना सतत अडथळा आणण्याचा प्रयत्न होत आहे.