शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

सिंघनपेठात पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 05:00 IST

सिंघनपेठ गावात १५० च्या वर घरे असून गावाची लोकसंख्या ७०० च्या जवळपास आहे. गावात काही विहिरी आहेत. तर ६ हातपंप आहेत. यापैकी होमराज करमे, शंकर येल्लुरकर, रवी कोडापे यांच्या घराजवळील तसेच जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावरील चार हातपंप बंद आहेत. त्यामुळे संपूर्ण गावाच्या पाण्याची मदार दोेन हातपंप व विहिरींवर अवलंबून आहे. विहिरीचे पाणी बकेटने काढावे लागते.

ठळक मुद्देसहापैकी चार हातपंप महिनाभरापासून बंद : दुरूस्तीकडे विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावर असलेल्या कोठारी ग्रामपंचायतमधील सिंगनपेठ गावातील ६ पैकी ४ हातपंप मागील एक महिन्यापासून बंद आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात येथील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.सिंघनपेठ गावात १५० च्या वर घरे असून गावाची लोकसंख्या ७०० च्या जवळपास आहे. गावात काही विहिरी आहेत. तर ६ हातपंप आहेत. यापैकी होमराज करमे, शंकर येल्लुरकर, रवी कोडापे यांच्या घराजवळील तसेच जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावरील चार हातपंप बंद आहेत. त्यामुळे संपूर्ण गावाच्या पाण्याची मदार दोेन हातपंप व विहिरींवर अवलंबून आहे. विहिरीचे पाणी बकेटने काढावे लागते. त्यामुळे बऱ्याचशा महिला विहिरीचे पाणी न भरता हातपंपाचे पाणी भरतात. जे हातपंप सुरू आहेत त्या हातपंपातूनही अतिशय कमी प्रमाणात पाणी निघते. या दोन्ही हातपंपाचे पाणी जेमतेम १० घरांना पुरू शकते. अशा स्थितीत संपूर्ण गावाचा भार या दोन हातपंपांना सांभाळावा लागत आहे. त्यामुळे दोन्ही हातपंपांवर महिलांची गर्दी दिसून येत आहे. आपल्या वॉर्डातील हातपंप बंद असल्याने दुसºया वॉर्डात जाऊन पाणी आणावे लागत आहे. ऐन पावसाळ्यात सिंगनपेठ येथील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने दिसून येत आहे.भाजपचे जिल्हा सचिव तथा आदिवासी आघाडीचे महाराष्टÑ प्रदेश सदस्य संदीप कोरेत यांनी अहेरीचे संवर्ग विकास अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. गावातील पाणीटंचाईची समस्या त्यांच्या लक्षात आणून दिली. हातपंप दुरूस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.दिवसभर शेतीचे काम, सायंकाळी पाण्यासाठी वनवनदिवसभर शेतीची कामे केल्यानंतर सायंकाळी पुन्हा पाण्यासाठी वनवन करावी लागत आहे. यामुळे येथील महिला त्रस्त झाल्या आहेत. गावातील बहुतांश नागरिकांकडे जनावरे आहेत. या जनावरांसाठीही पाणी लागत असल्याने अधिकचे पाणी भरावे लागत आहे. त्यातच गावातील हातपंप बंद आहेत. पंचायत समितीने याकडे लक्ष घालून हातपंप दुरूस्त करून द्यावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात