शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शेडला लोहपत्र्यांची प्रतीक्षा

By admin | Updated: March 11, 2015 00:06 IST

स्थानिक रेल्वे स्थानकावर शेडचे बांधकाम होऊन सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी शेडला लोहपत्रे लावण्यात आले नाही.

लोकमत विशेषमहेंद्र चचाणे देसाईगंजस्थानिक रेल्वे स्थानकावर शेडचे बांधकाम होऊन सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी शेडला लोहपत्रे लावण्यात आले नाही. त्यामुळे उभारलेले लोखंडी खांब केवळ देखावा ठरले असून रेल्वे प्रवाशांना उन्हातच रेल्वेची वाट पाहत बसावे लागत आहे. देसाईगंज येथे जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणारे नागरिक प्रथम देसाईगंज येथूनच पुढचा प्रवास करतात. परिणामी या रेल्वे स्थानकावर नेहमीच गर्दी राहते. देसाईगंज येथे ६०० मीटर लांबीचा फलाट तयार करण्यात आला आहे. यापूर्वी या ठिकाणी टिनाचे केवळ दोनच शेड होते. परिणामी प्रवाशांची फार मोठी अडचण होत होती. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन याठिकाणी आणखी दोन शेडचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होऊ लागली होती. या मागणीची रेल्वे विभागाने दखल घेऊन दोन नवीन शेड बांधकामाला सहा महिन्यांपूर्वी सुरुवात केली. यातील एका शेडचे बांधकाम पूर्णपणे झाले आहे. मात्र दुसरे शेडचे बांधकाम अपूर्ण राहिले आहे. या शेडचे लोखंडी खांब उभारण्यात आले आहेत. मात्र टिनाचे पत्रे लावण्यात आले नाही. त्यामुळे या शेडचा प्रवाशांना कोणताही फायदा नसून उन्हातच राहावे लागत आहे. पुढील महिन्यापासून उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे. त्यावेळी प्रवाशांना सावली शोधण्यासाठी इतर शेडचा आधार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे अपूर्ण शेडवर टिनाचे पत्रे टाकावे, अशी मागणी आहे.