लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विधानसभा निवडणुकीवर मतदारांनी बहिष्कार टाकून त्यात सहभागी न होण्यासाठी नक्षलवाद्यांनी भामरागड तालुक्यात बॅनर लावून आवाहन केले होते. मात्र काही गावकऱ्यांनी त्याला प्रतिसाद न देता नक्षल्यांचे आवाहन झुगारून लावून त्यांचे बॅनर जाळले.भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या लाहेरी उपपोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाहेरी, मलमपडुर, भुसेवाडा, कुकामेटा, लष्कर, आलदंडी व गोपणार या भागात नक्षलवाद्यांनी बॅनर व पोस्टर्स लावून नागरिकांनी निवडणूक बहिष्काराचे आवाहन केले होते. मात्र नागरिकांनी आमचा विश्वास लोकशाहीवरच आहे हे दाखविण्यासाठी त्या बॅनर व पोस्टरची होळी केली. यावेळी नक्षलवाद्यांविरूद्ध घोषणाबाजीही करण्यात आली.लाहेरी परिसरातील नागरिकांप्रमाणेच इतर नागरिकांनीही नक्षलवाद्यांना विरोध करून लोकशाहीच्या बळकटीसाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले.
मतदारांनी झुगारले नक्षल्यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 06:00 IST
भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या लाहेरी उपपोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाहेरी, मलमपडुर, भुसेवाडा, कुकामेटा, लष्कर, आलदंडी व गोपणार या भागात नक्षलवाद्यांनी बॅनर व पोस्टर्स लावून नागरिकांनी निवडणूक बहिष्काराचे आवाहन केले होते. मात्र नागरिकांनी आमचा विश्वास लोकशाहीवरच आहे हे दाखविण्यासाठी त्या बॅनर व पोस्टरची होळी केली.
मतदारांनी झुगारले नक्षल्यांचे आवाहन
ठळक मुद्देबॅनरची होळी : भामरागड तालुक्यातील प्रकार