शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

काेंदावाहीत रंगले व्हाॅलीबाॅल व कबड्डीचे सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:09 IST

धानाेरा : तालुक्यातील काेंदावाही येथे ग्रामसभेच्या पुढाकाराने परिसरातील ५० गावांनी एकत्र येऊन चार दिवसीय व्हाॅलीबाॅल व कबड्डीचे सामने यशस्वीपणे ...

धानाेरा : तालुक्यातील काेंदावाही येथे ग्रामसभेच्या पुढाकाराने परिसरातील ५० गावांनी एकत्र येऊन चार दिवसीय व्हाॅलीबाॅल व कबड्डीचे सामने यशस्वीपणे पार पाडले. या स्पर्धेत परिसरातील १००पेक्षा जास्त संघ सहभागी झाले होते. अनेक संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून स्पर्धेला रंगत चढविली.

स्व. डाॅ. ब्रम्हदेव शर्मा यांच्या स्मृतिनिमित्त ग्रामसभा काेंडावाही व संयुक्त ग्रामसभांच्या वतीने आदिवासी युवा खेळ स्पर्धा पार पडली. संघभावना व युवा संघटना वाढविण्यासाठी क्रीडा स्पर्धेचा उपयाेग हाेताे. या माध्यमातून खिलाडूवृत्ती जाेपासली जाते. हा उद्देश समाेर ठेवून स्पर्धा आयाेजित करण्यात आली. दरवर्षी राेटेशन पद्धतीने स्पर्धेचे आयाेजन करण्यात येते. यावर्षी दिवसा क्रीडा स्पर्धा व रात्री आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन मनाेरंजन करण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रमात गाेंडीनृत्य, समूहनृत्य, तरंग वाद्य, रेला, पिपरी आदींचा समावेश हाेता. २२ गावातील ग्रामस्थांनी सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घेतला. तत्पूर्वी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन खुटगाव इलाक्याचे माजी प्रमुख इस्तरी परसे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी आमदार हिरामण वरखडे हाेते. यावेळी भुम्या महारू पदा, काेंदावाही - झाडाभापडा इलाका गायता सकरू जांगी, खुटगाव इलाक्याचे पेनवाे कारू परसे, इलाका भुम्या पैकू परसे, गायता परशुराम परसे, झाडाभापडा इलाका गायता झिंगू धुर्वे, पेनवाे मैनू धुर्वे, मांजीगड इलाक्याचे माजी प्रमुख रामसू पाेटावी, काेंदावाही ग्रामसभेचे अध्यक्ष देवाजी पदा उपस्थित हाेते.

स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी काेंदावाही येथील ग्रामसभेच्या सदस्यांनी सहकार्य केले.