शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

अहेरीत निघाला विराट मोर्चा

By admin | Updated: August 16, 2014 23:28 IST

अनुसूचित जमातीत इतर कुठल्याही समाजाला समाविष्ट करू नये तसेच गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्के करण्यात यावे, अहेरी जिल्हा निर्माण करण्यात यावा आदी मागण्यांसाठी आज अहेरी

पट्टे वाटप करण्याची मागणी : हजारो आदिवासी बांधव उपस्थितअहेरी : अनुसूचित जमातीत इतर कुठल्याही समाजाला समाविष्ट करू नये तसेच गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्के करण्यात यावे, अहेरी जिल्हा निर्माण करण्यात यावा आदी मागण्यांसाठी आज अहेरी येथे आदिवासी कृती समितीच्यावतीने माजीमंत्री धर्मरावबाबा आत्राम व जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात हजारो आदिवासींचा मोर्चा काढण्यात आला. एस. बी. महाविद्यालयाच्या मैदानावरून आदिवासी परंपरागत ढोलताशाच्या निनादात हा मोर्चा प्रारंभ झाला. दीड तास शहराच्या मुख्य मार्गावरून हा मोर्चा चालत जाऊन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष बबलू हकीम, युवा नेते ऋतूराज हलगेकर, क्रिष्णरावबाबा, पं. स. सदस्य रामेश्वर आत्राम, मुतन्ना दोंतूलवार, मुतन्ना पेंदाम, आशाताई पोहणेकर, पुष्पा अलोणे, संजय चरडुके, यशवंत दोंतुलवार, प्रभाकर येनगंटीवार, नामदेव आत्राम, अहेरीचे सरपंच गंगाराम कोडापे, विलास सिडाम, सुरेंद्र अलोणे, नागेश मडावी, सरपंच सतीश आत्राम, जि.प. सदस्य ज्ञानकुमारी कौशी, जि.प. सदस्य लैजा चालुरकर, लक्ष्मी कुळमेथे, उषा आत्राम, मिनाक्षी सडमेक, प्रशांत आर्इंचवार, दौलत दहागावकर, अरूण बेझलवार, मल्लिकार्जुन आकुला, अ‍ॅड. राजेंद्र मेंगनवार, डॉ. निखील इजतदार, अ‍ॅड. कोंडागुर्ला, आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेश हलामी, बबलू सडमेक यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय धिवरे यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना एक निवेदन पाठविण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार किशोर कुणालपवार आदी उपस्थित होते. मोर्चानंतर जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत अनुसूचित जमातीत धनगरांना आरक्षण देण्यात येऊ नये, असे धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले. मागील पाच वर्षांपासून बीपीएल व वनजमिनीवरील अतिक्रमणाचा विषय प्रलंबित आहे. मात्र त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली. अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय धिवरे यांनी मोर्चेकऱ्यांना सामोरे जाऊन निवेदनाबद्दलची माहिती दिली. या जाहीर सभेला मेहबूब अली, ऋषी पोरतेट व बबलू सडमेक यांनीही मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)