वऱ्हाड्याच्या ट्रॅक्टरला ट्रकची धडक, वृद्धा ठार; दोन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 23:53 IST2020-03-06T23:53:11+5:302020-03-06T23:53:47+5:30
ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून गांगुली गावाला साक्षगंधासाठी जात असलेल्या वऱ्हाड्यांना समोरून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक बसल्याने एक वृद्ध महिला ठार झाली तर ९ जण जखमी झाले. त्यापैकी दोघे गंभीर आहेत. हा अपघात कुरखेडा तालुक्याच्या कढोलीनजिक शुक्रवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडला.

वऱ्हाड्याच्या ट्रॅक्टरला ट्रकची धडक, वृद्धा ठार; दोन गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून गांगुली गावाला साक्षगंधासाठी जात असलेल्या वऱ्हाड्यांना समोरून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक बसल्याने एक वृद्ध महिला ठार झाली तर ९ जण जखमी झाले. त्यापैकी दोघे गंभीर आहेत. हा अपघात कुरखेडा तालुक्याच्या कढोलीनजिक शुक्रवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडला.
सुलोचना टिकाराम ठाकरे (६५) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. याशिवाय टिकाराम सिताराम ठाकरे (७०) व वच्छला राऊत (६०) हे दोन वऱ्हाडी गंभीर जखमी आहेत. एमएच-३४-एबी-२५५० क्रमांकाच्या ट्रकने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. इतर जखमींमध्ये धनराज ठेंगरी (४२), सत्यभामा नक्टू ठेंगरा (६५), धर्मा नागो ठाकरे (७०) अनिकेत रामदास ठाकरे (१८), प्रतिभा रामदास ठाकरे (४५), प्रतीक गिरीधर ठाकरे (१२), प्रणाली गिरीधर ठाकरे (१६), सर्व राहणार कढोली आदींचा समावेश आहे. या अपघातात ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसलेले सगळेजण इतरत्र फेकल्या जाऊन ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच घटनास्थळावर गर्दी झाली. गंभीर जखमींना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. इतर जखमींना कुरखेडाच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रॉलीत फसलेला वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढला.