शहरं
Join us  
Trending Stories
1
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
2
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
3
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
4
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
5
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
6
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
7
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
8
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
9
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
10
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
11
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
12
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
13
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
14
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
15
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
16
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
17
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
18
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
19
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
20
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य मार्गावर वाहनांचे बस्तान

By admin | Updated: June 7, 2015 02:00 IST

शहरातील मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूला खासगी प्रवासी वाहने तासणतास उभी राहत असल्याने वाहतुकीचा खोळंबा

आरमोरी वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष : अपघाताची शक्यता बळावली
आरमोरी : शहरातील मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूला खासगी प्रवासी वाहने तासणतास उभी राहत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत असून अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे. मात्र याकडे शहर वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे.
आरमोरी हे जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. या शहरातून ब्रह्मपुरी, नागपूर, देसाईगंज व गडचिरोलीकडे जाता येत असल्याने मुख्य मार्गावर नेहमीच चारचाकी व दुचाकी वाहनांची वर्दळ राहते. शहरात रस्ता दुभाजक नसल्याने बहुतांश वाहने रस्त्याच्या मधूनच ये-जा करतात. बाजुला दुकानदारांनी अतिक्रमण करून जागा बळकाविली आहे. तर दुसरीकडे प्रवासी वाहतूक करणारे काळीपिवळी, टॅक्सी वाहने याच ठिकाणी ठेऊन प्रवासी गोळा करतात. सामान घेऊन येणारे ट्रकही रस्त्याच्या बाजुला उभे करून मालाची उचल केल्या जाते. तासणतास ही वाहने रस्त्याच्या बाजुला राहत असल्याने विशेषकरून पायदळ जाणाऱ्या व सायकलस्वारांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी एका वाहतूक पोलिसाची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र वाहतूक पोलीस नेमकी कुठली वाहतूक नियंत्रित करते, याचा पत्ता लागत नाही. शहरातील बसस्थानकाजवळ नेहमीच वाहनांची वर्दळ राहते. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक पोलीस असणे गरजेचे असतानाही वाहतूक पोलिसांचे मात्र दर्शनच लाभत नाही. रस्त्याच्या बाजुला वाहने उभे करून प्रवासी भरले जात असल्याने याला वाहतूक पोलिसाचेच अभय असल्याचेही बोलले जात आहे. पोलिसांचा धाक नसल्याने वाहनधारकांची मनमानी वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)