शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वसंतपूर चार दिवसांपासून अंधारात

By admin | Updated: May 9, 2016 01:35 IST

तालुक्यातील वसंतपूर येथे मंगळवारच्या मध्यरात्री वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस झाला.

वादळामुळे वीज खांब तुटले : महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ त्रस्तचामोर्शी : तालुक्यातील वसंतपूर येथे मंगळवारच्या मध्यरात्री वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस झाला. परंतु वादळाच्या प्रचंड वेगाने येथील सिमेंटचे वीज खांब तुटून पडले. वीज ताराही अस्ताव्यस्त झाल्या. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. परंतु मंगळवारनंतर चार दिवसांचा कालावधी उलटूनही अद्यापही गावातील वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. याबाबीकडे वीज वितरण कंपनीचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांना चार दिवसांपासून अंधारात राहावे लागत आहे. चामोर्शी तालुक्यातील वसंतपूर येथे मंगळवारी आलेल्या जोरदार वादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेकांचे छतही उडून गेले. शिवाय झोपड्या व इतर ठिकाणचे गवतही अस्ताव्यस्त झाले. परिसरातील अनेक झाडे तुटून पडली. परिणामी अनेक वीज तारांवर फांद्याही पडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. दुसऱ्या दिवशी सदर वीज पुरवठा पूर्ववत करण्याकरिता नवीन वीज खांब लावून तारांची जुळवाजुळव करणे गरजेचे होते. परंतु या सर्व बाबीकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. परिणामी दमट व उष्ण वातावरणात नागरिकांना अंधारातच राहावे लागत आहे. परिणामी ग्रामस्थांमध्ये वीज वितरण कंपनीच्या कारभाराविषयी तीव्र रोष व्यक्त होत आहे. गावातील वीज पुरवठा खंडित होऊन चार दिवसांचा कालावधी उलटला. सर्वत्र अस्ताव्यस्त वस्तू पडलेल्या आहेत. मात्र वीज गावातील वीज पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)आष्टी कार्यालयाकडून उपाययोजना नाहीवसंतपूर येथे मंगळवारी आलेल्या वादळामुळे वीज खांब तुटून वीज पुरवठा खंडित झाला, याची माहिती गावातील सरपंचांनी भ्रमणध्वनीवर आष्टी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला दिली. परंतु येथून कोणताही कर्मचारी गावात वीज दुरूस्तीसाठी आला नाही. गावात पिठ गिरणी, मोटारपंप, संगणकावर विविध कामे केली जातात. परंतु वीज पुरवठा खंडित असल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. गावात सिमेंटच्या वीज खांबऐवजी लोखंडी वीज खांब बसवावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गावातील अनेक आंबेही गळून पडले. त्यामुळे नुकसान झाले. वीज पुरवठा पूर्ववत न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.