शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

वनोपजातून रोजगार निर्मितीस वाव

By admin | Updated: October 28, 2014 22:57 IST

गडचिरोली जिल्हा विविध जातींच्या वृक्षांनी व्यापलेला आहे. जिल्ह्यातील जंगलात विविध जातीच्या औषधी वनस्पतींची भरमार आहे. परंतु जिल्ह्यात वनोपजावर आधारित उद्योगधंदे नसल्याने येथील युवक

मालेवाडा : गडचिरोली जिल्हा विविध जातींच्या वृक्षांनी व्यापलेला आहे. जिल्ह्यातील जंगलात विविध जातीच्या औषधी वनस्पतींची भरमार आहे. परंतु जिल्ह्यात वनोपजावर आधारित उद्योगधंदे नसल्याने येथील युवक रोजगाराच्या शोधात मोठमोठ्या शहरात भटकत आहे. शिकूण सवरूनही आदिवासी युवक बांधकाम व्यवसाय, हॉटेल, पापड, लोणची, मसाले, कंपन्यांमध्ये सुरक्षा रक्षक आदी प्रकारच्या दुय्यम व्यवसायाकडे वळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात वनोपजावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्याची गरज आहे. संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून वनविभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी आहे.जिल्ह्यात वनसंपदा असूनही उद्योगांचा अभाव आहे. वनातून सहज उपलब्ध होणाऱ्या वनोपजावर उद्योग उभारण्याची गरज जिल्ह्यात वनोपज बांबू व तेंदू यांचा वाटा सर्वाधिक आहे. यावर्षी पेपर मिलची बांबू कटाई मजुरांच्या मजुरीसंबंधी वाटाघाटी करण्यातच अडकून आहे. मजुरांच्या मजुरी ठरविण्यातच सदर प्रक्रिया अडकली आहे. त्यामुळे या रोजगारासंबंधी मजूर साशंक आहेत. बांबू कटाईनंतर तेंदूपत्ता हा सर्वात मोठा रोजगार म्हणून येथील नागरिकांना उपलब्ध होतो. जिल्ह्यातील अनेक कुटुंब उन्हाळ्याच्या दिवसात तेंदूपत्ता संकलनाचे काम करतात. मात्र मजुरांना बोनस देण्याऐवजी वनरक्षक, वनपाल आपापले वेतन वाढविण्याच्या कामात गुंतल्याने वनमजुरांना यापुढे बोनस मिळणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात औषधी वनस्पतींचीही भरमार आहे. परंतु विविध औषधी वनस्पतींच्या वापराबाबत नागरिकच अनभिज्ञ आहेत. डिंक, लाख, राळ, चारोळी, बिबा, हिरडा, आवळा, बेहडा, अनंतमूळ, करंज बी, पळस बी यासारख्या औषधी वनस्पती जिल्ह्याच्या वनात मोठ्या प्रमाणात आहेत. जिल्ह्यातील वनोपज आदिवासी बांधव गोळा करतात. मात्र अल्पकिंमतीत सदर वनोपज औषधी कंपन्यांना कमी भावात कच्च्या मालाच्या स्वरूपात विकून टाकतात. वनविभागाने सदर वनोपज अधिकृतरित्या खरेदी करून स्थानिक लोकांना विक्रीचे अधिकार दिले तर त्यातून प्रचंड प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. डिंक प्रतवारी करून लाख, चारोळी यासारखी उत्पादने मध, मोहफूल आदी गौण वनोपज महिला बचत गट संयुक्त वनव्यवस्थापन समित्यामार्फत गोळाकरून विक्री केल्यास रोजगार निर्मिती होऊ शकेल. रिकाम्या हातांना शेतीच्या रिकाम्या हंगामात जोडधंदा उपलब्ध होऊ शकेल. रेशीम कीडपालन, पशुपालन, दुग्ध व्यवसाय यातूनही आर्थिक उत्पन्न वाढीस हातभार लावू शकतो. वनोपजावर उद्योग उभारल्यास जिल्ह्यात रोजगार निर्मितीस वाव आहे.