शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सोमवारपासून अनलॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:27 IST

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ६.५१ टक्के असून ऑक्सिजन बेडही पुरेशा प्रमाणात शिल्लक आहेत. त्यामुळे कोरोनाची स्थिती खूप चांगली नसली तरी ...

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ६.५१ टक्के असून ऑक्सिजन बेडही पुरेशा प्रमाणात शिल्लक आहेत. त्यामुळे कोरोनाची स्थिती खूप चांगली नसली तरी बरीच नियंत्रणात आहे. त्यामुळे पाच लेव्हलपैकी गडचिरोली जिल्हा तिसऱ्या लेव्हलला आला आहे. ही स्थिती अजून सुधारल्यास लॉकडाऊनची बंधने अजून कमी केली जाणार आहे.

काय सुरू राहील?

१) सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत आठवड्याचे सर्व दिवस सुरू राहतील.

२) अत्यावश्यक सेवेतील वगळून इतर दुकाने सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत पण केवळ सोमवार ते शुक्रवार सुरू राहतील.

३) रेस्टॉरेंट, खानावळीत सोमवार ते शुक्रवार ५० टक्के उपस्थितीत बसून नाश्ता, जेवण करण्याची परवानगी.

४) सकाळी ७ ते ९ पर्यंत सकाळी फिरायला जाण्यास परवानगी असेल, तसेच क्रीडांगणावर सकाळ-संध्याकाळ खेळता येईल.

५) ५० लोकांच्या मर्यादेत लग्न किंवा इतर कार्यक्रम घेता येईल. अंत्यसंस्कारासाठी मात्र २० ची मर्यादा कायम राहील.

६) आंतरजिल्हा जाण्यासाठी आता ई-पासची गरज पडणार नाही. एसटी बसेस १०० टक्के क्षमतेने सुरू राहतील.

कायम बंद राहील?

१) संध्याकाळी ५ ते सकाळी ७ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू राहील. त्यामुळे अत्यावश्यक कामे वगळता कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही.

२) लेव्हल-५ मध्ये असलेल्या जिल्ह्यातून किंवा दुसऱ्या राज्यातून येण्यासाठी ई-पास घ्यावी लागेल. उर्वरित जिल्ह्यातून येण्यासाठी पासची गरज राहणार नाही.

३) मॉल, सिनेमागृह आणि पानठेले आदी उघडण्यास अद्याप परवानगी राहणार नाही. भविष्यात स्थिती सुधारल्यास त्याला परवानगी मिळू शकेल.

कोट-

लॉकडाऊनमध्ये बऱ्याच प्रमाणात शिथिलता देण्याचा निर्णय झाला आहे. रविवारी त्याबाबतचा आदेश काढला जाईल. दर आठवड्याला स्थितीचा आढावा घेऊन परिस्थितीनुसार निर्बंध अजून शिथिल करायचे, की आणखी कडक करायचे याचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे नागरिकांनी बिनधास्तपणे न वागता स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करावी.

- दीपक सिंगला, जिल्हाधिकारी