उद्धव ठाकरेंच्या नशिबी चक्की पिसींगवाल्यांचाच सहवास, चित्रा वाघ यांची खोचक टीका

By संजय तिपाले | Updated: September 13, 2023 15:50 IST2023-09-13T15:47:49+5:302023-09-13T15:50:42+5:30

गडचिरोलीत महिला पदाधिकाऱ्यांचा मेळावा

Uddhav Thackeray's fate as the company of returners from the jail, Chitra Wagh criticizes | उद्धव ठाकरेंच्या नशिबी चक्की पिसींगवाल्यांचाच सहवास, चित्रा वाघ यांची खोचक टीका

उद्धव ठाकरेंच्या नशिबी चक्की पिसींगवाल्यांचाच सहवास, चित्रा वाघ यांची खोचक टीका

गडचिरोली : शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला, अन्यथा ते अमेरिकेच्या प्रमुखांच्या बाजूला बसले असते. त्यांच्या नशिबी मात्र कारागृहात जाऊन आलेल्या चक्की पिसींगवाल्या संजय राऊतांचाच सहवास आहे, अशी खोचक टीका भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली. 

भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यासाठी चित्रा वाघ १३ सप्टेंबरला गडचिरोलीत आल्या हाेत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, खालच्या पातळीवर जाऊन आमच्या नेत्यांवर टीका करायची, त्यांच्या शारीरिक व्यंगावर बोलायचे. आमचे नेते संयमी, सुसंस्कत आहेत, त्यामुळे ते त्या पातळीवर प्रत्युत्तर देत नाहीत. मात्र, आमचा बांध तुटतो आहे.  

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यावर ज्याप्रकारची टीका केली गेली, तो समस्त ओबीसी समाजाचा अपमान आहे. सरकारच्या धोरणावर किंवा एखाद्या निर्णयावर टीका करणे ठीक, पण नेत्यांवर अशापद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन काहीही बोलणे हे आम्ही आता खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस रेखा डोळस, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांची उपस्थिती होती.

Web Title: Uddhav Thackeray's fate as the company of returners from the jail, Chitra Wagh criticizes