शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

संख्याबळ असल्याचा दोनही गटाचा दावा

By admin | Updated: September 20, 2014 23:49 IST

५१ सदस्यीय गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक रविवारी २१ सप्टेंबर रोजी होऊ घातली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करण्यावर दोनही पक्षाकडून भर दिला जात आहे.

जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूकगडचिरोली : ५१ सदस्यीय गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक रविवारी २१ सप्टेंबर रोजी होऊ घातली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करण्यावर दोनही पक्षाकडून भर दिला जात आहे. राष्ट्रवादीला अध्यक्ष पद व काँग्रेसला उपाध्यक्ष पद अशा फॉर्म्युल्यावर रात्री उशीरापर्यंत चर्चा सुरू होती. विविध पक्षाचे उमेदवार फुटल्यामुळे सत्तेसाठी लागणारे संख्याबळ आपल्याकडे असल्याचा दावा सर्वच गट करीत आहे. त्यामुळे मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. बहूमतासाठी लागणारे २६ सदस्यांचे संख्याबळ दोनही गट कसे जमवते यावरच जिल्हा परिषदेची निवडणूक अवलंबून राहणार आहे. गेल्यावेळी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, युवाशक्तीच्या मदतीने सत्तेची मोट बांधण्यात आली होती. यावेळी भाजपमधून तीन सदस्य फुटलेले आहेत. युवाशक्ती आघाडीही अभंग राहिलेले नाही. काँग्रेसचेही सदस्य वेगवेगळ्या गटात विभाजीत आहे. त्यामुळे सत्ता समिकरण बदलण्याची चिन्ह आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून दोन गट आमनेसामने उभे ठाकणार आहेत. काँग्रेस पक्षाचे १३ सदस्यांपैकी ७ सदस्य एका बाजुला असून उर्वरित सदस्य आपआपल्या समर्थक गटाकडे गेलेले आहे. राज्यपातळीवर शिवसेना, भाजप, नाविस यांची आघाडी विधानसभेसाठी होणार असल्याने स्थानिक निवडणुकीतही ही आघाडी टिकून राहिल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. भाजपचे तीन सदस्यही फुटले आहेत. त्यामुळे परिस्थिती आणखी संभ्रमावस्थेत आहे. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष नेमके कोण होतात. हे सभागृहातच दिसून येईल. सुत्रांच्या माहितीनुसार अध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाकडे डॉ. तामदेव दुधबळे, संध्या दुधबळे, नामदेव सोनटक्के तर नव्याने भाजपात आलेले बंटी भांगडिया यांच्याकडून वर्षा कौशिक यांचेही नाव रेटले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुलचेराचे जिल्हा परिषद सदस्य जीवन कुत्तरमारे यांचे नाव आघाडीवर आहे. काँग्रेसनेही अध्यक्ष पदासाठी जीवन नाट, लंकेश भोयर यांचे नाव समोर केले आहे. उपाध्यक्ष पदाकरीता राष्ट्रवादी काँग्रेस, युवाशक्ती आघाडी (चंदेल गट) यांच्याकडून छायाताई कुंभारे, अपक्ष सदस्य विश्वास भोवते, अतुल गण्यारपवार यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र सत्तेचे समिकरण किचकट झाले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)काँग्रेस निरीक्षक दिल्लीत; स्थानिक नेतेच घेणार निर्णयप्रदेश काँग्रेसच्यावतीने निवडणूक निरीक्षक म्हणून विधान परिषद सदस्य आमदार हरिभाऊ राठोड शनिवारी गडचिरोलीत येणार होते. परंतु विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपाच्या गडबडीमुळे ते आले नाहीत. त्यामुळे काँग्रेसची बैठक आज झाली नाही. स्थानिक स्तरावरील नेत्यांनी व जि.प. सदस्यांनी एकत्र बसून योग्य तो निर्णय घ्यावा, असे निर्देश प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आले आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. काँग्रेसला जिल्हा परिषदेत कुठल्याही परिस्थितीत पद हवे आहे. पक्षाच्या सदस्यांना बसण्यासाठी एक तरी चेंबर हवे, अशी भूमिका काँग्रेसचे नेते आता मांडू लागले आहे. जे पद देतील त्यांच्याकडे जाऊ असा काँग्रेसचा फॉर्म्युला आहे व तो सर्व गटांकडे ठेवलेला आहे.