शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दोन कृषी पर्यवेक्षकांना लाचखोरीच्या प्रकरणात अटक

By admin | Updated: September 17, 2014 23:47 IST

कृषी विभागामार्फत खोदण्यात येणारे शेततळे व कोल्हापुरी पद्धतीचे बंधाऱ्याचे काम मिळवून देण्यासाठी दोन लाख रूपयांची लाच मागितल्या प्रकरणाच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने

गडचिरोली : कृषी विभागामार्फत खोदण्यात येणारे शेततळे व कोल्हापुरी पद्धतीचे बंधाऱ्याचे काम मिळवून देण्यासाठी दोन लाख रूपयांची लाच मागितल्या प्रकरणाच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सापळा रचून दोन कृषी पर्यवेक्षकांना अटक केली आहे. त्यांच्या विरूद्ध कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना सिंचन सुविधेचा लाभ मिळावा याकरिता कृषी विभागामार्फत शेततळे व कोल्हापुरी बंधारे बांधण्याचे काम करण्यात येत आहे. आरमोरी तालुक्यातही शेततळे व कोल्हापुरी बंधारे बांधण्याच्या कामासाठी कंत्राट देण्याकरिता तालुका कृषी कार्यालयातील वर्ग ३ चे कृषी पर्यवेक्षक वसंत वंजारी व गोविंद भोयर यांनी कंत्राटदाराला २ लाख रूपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आज वसंत वंजारी व गोविंद भोयर या दोघांना अटक केली आहे. त्यांच्या विरूद्ध सेक्शन ७ अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर विभागीय पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक मतकर, पोलीस उपअधीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनात गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली. गेल्या साडेआठ महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात १५ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)