आजारी जावयाला भेटून घरी परतणाऱ्या सासऱ्यांसाठी ट्रक ठरला काळ; अपघातात दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:39 IST2026-03-20T13:33:54+5:302026-03-20T13:39:22+5:30
Gadchiroli : आजारी जावयाची विचारपूस करून परतणाऱ्या सासऱ्याची दुचाकी उभ्या ट्रकवर धडकली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Truck turns out to be a life-changing event for in-laws returning home after visiting sick son-in-law; Tragic death in accident
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी: आजारी जावयाची विचारपूस करून परतणाऱ्या सासऱ्याची दुचाकी उभ्या ट्रकवर धडकली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना १५ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता एका पेट्रोलपंपाजवळ घडली. भावराव जनाजी मंगरे (५५, रा. वनखी, ता. आरमोरी) असे मयताचे नाव आहे. त्यांचे जावई अर्जुन चिंचोलकर (रा. कोसारा, जि. चंद्रपूर) हे आजारी असल्याने ब्रह्मपुरी येथील एका खासगी रुग्णालयात जावयाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भावराव ब्रह्मपुरीला गेले होते. ते दुचाकीने (एमएच ३४ सीएन-२०५४) परतत असताना आरमोरी येथे उभ्या ट्रकवर दुचाकी आदळली. यात जखमी झालेले भावराव यांना तातडीने ब्रह्मपुरीला खासगी दवाखान्यात भरती केले. १६ मार्च रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
'तो' ट्रक ठरला काळ!
आरमोरीजवळील एका पेट्रोल पंपासमोर ट्रक (सीजी ०७ सीएम-४७९५) कोणत्याही प्रकारचे रिफ्लेक्टर किंवा सुरक्षेचे चिन्ह न लावता रस्त्याच्या मधोमध उभा होता. मृत भावराव यांचे पुतणे प्रफुल्ल मंगरे यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालकावर गुन्हा नोंद झाला.