लग्नाचे वचन देऊन आदिवासी परिचारिकेवर केला ‎अत्याचार; अहेरीचा कंत्राटदार फरार

By संजय तिपाले | Updated: February 26, 2026 15:53 IST2026-02-26T15:50:02+5:302026-02-26T15:53:09+5:30

Gadchiroli : मैत्रीचे नाटक करून एका २७ वर्षीय आदिवासी परिचारिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, त्यानंतर लग्नाचे वचन देऊन वारंवार अत्याचार केला.त्यानंतर आरोपीने पीडितेची जात काढून लग्नास नकार दिला, तसेच तिला बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडले.

Tribal nurse raped on promise of marriage; contractor absconding | लग्नाचे वचन देऊन आदिवासी परिचारिकेवर केला ‎अत्याचार; अहेरीचा कंत्राटदार फरार

Tribal nurse raped on promise of marriage; contractor absconding

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
मैत्रीचे नाटक करून एका २७ वर्षीय आदिवासी परिचारिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, त्यानंतर लग्नाचे वचन देऊन वारंवार अत्याचार केला.त्यानंतर आरोपीने पीडितेची जात काढून लग्नास नकार दिला, तसेच तिला बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडले. ही खळबळजनक घटना २४ फेब्रुवारी रोजी अहेरीत उघडकीस आली. याप्रकरणी  एका कंत्राटदाराविरुद्ध अत्याचार व अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून तो फरार झाला आहे.

​पोलिसांच्या माहितीनुसार, अभिषेक सतीश आईलवार (३०, रा. अहेरी)  असे आरोपीचे नाव आहे.त्याने पीडित तरुणीशी मैत्री केली होती. 'तू मला खूप आवडतेस, आपण लवकरच लग्न करू', असे  आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. जुलै २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या दरम्यान त्याने पीडितेच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

​तुझी जात वेगळी म्हणत जाळली कागदपत्रे 

‎पीडिता गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिला लग्नाचे वचन पूर्ण करण्याऐवजी समाजात बदनामी करण्याची भीती घातली आणि बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतर जेव्हा पीडितेने लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा 'तू आदिवासी समाजाची आहेस, तुझी जात वेगळी आहे', असे म्हणत त्याने लग्नास स्पष्ट नकार दिला. एवढेच नव्हे तर, पीडितेच्या गर्भधारणेचे सर्व पुरावे आणि कागदपत्रेही त्याने जाळून नष्ट केली.

​हतबल पीडिता अखेर पोलिस ठाण्यात 

‎या जाचाला कंटाळून हतबल पीडितेने अखेर अहेरी पोलिस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध कलम ६९, २४१, ३५१(२) भारतीय न्याय संहिता २०२३ सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
‎​
‎आरोपीचा शोध सुरू 

‎या प्रकरणाचा पुढील तपास अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे हे करत आहेत. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपीने पोबारा केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपीचा शोध सुरू असल्याचे अजय कोकाटे यांनी 'लोकमत'ला सांगितले.

Web Title : आदिवासी नर्स से शादी का वादा कर बलात्कार, ठेकेदार फरार

Web Summary : अहेरी में एक ठेकेदार पर आदिवासी नर्स से शादी का वादा कर बलात्कार करने का आरोप है। बाद में उसने जाति के कारण इनकार कर दिया और गर्भपात के लिए मजबूर किया। आरोपी फरार है, मामला दर्ज।

Web Title : Contractor absconds after raping tribal nurse on marriage promise.

Web Summary : A contractor in Aheri allegedly raped a tribal nurse after promising marriage, then refused due to her caste and forced an abortion. Police have registered a case under atrocity laws; the accused is absconding.