जिल्हा कारागृहात कैैद्यांची क्षयरोग तपासणी

By Admin | Updated: April 1, 2017 02:08 IST2017-04-01T02:08:53+5:302017-04-01T02:08:53+5:30

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था गडचिरोलीच्या वतीने

Trial of prisoners in District Jail | जिल्हा कारागृहात कैैद्यांची क्षयरोग तपासणी

जिल्हा कारागृहात कैैद्यांची क्षयरोग तपासणी

शिबिर : मधुमेह, रक्तदाब चाचणी
गडचिरोली : सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था गडचिरोलीच्या वतीने क्षयरोग दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी येथील जिल्हा कारागृहात कैैद्यांची क्षयरोग तपासणी करण्यात आली.
कैैद्यांची मधुमेह व उच्च रक्तदाब चाचणी करून थुंकीचे नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात आले. क्षयरोग म्हणजे काय, तो कसा पसरतो, त्यावर औषधोपचार काय, सीबी नॅट यंत्र, एलईडी आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हा कारागृहाचे पोलीस अधीक्षक देवराव आळे, वरिष्ठ तुरूंग अधिकारी ए. सी. निमगडे, जिल्हा कारागृह सुभेदार अरविंद मेश्राम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुनील मडावी, वैैद्यकीय अधिकारी डॉ. रूपेश पेंदाम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुनील मडावी यांनी केले तर संचालन व आभार गणेश खडसे यांनी मानले. यशस्वीतेसाठी अनिल चव्हाण, राहूल रायपुरे, महादेव वाघे, विनोद काळबांधे, ज्ञानदीप गलबले, विलास भैसारे, सीमा बिश्वास, इंदू जेंगठे आदी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Trial of prisoners in District Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.