शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांची पावले मेडिगड्डा धरणाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:42 IST

तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर बांधलेल्या मेडिगड्डा धरणाचे मागच्या महिन्यात लोकार्पण झाले. सदर धरण आता पावसामुळे चांगलेच भरले असून हे धरण पाहण्यासाठी पर्यटकांची पावले तिकडे वळत आहेत.

ठळक मुद्देसागराप्रमाणे दिसते दृश्य : प्रभावित गावांच्या अडचणीत होणार वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर बांधलेल्या मेडिगड्डा धरणाचे मागच्या महिन्यात लोकार्पण झाले. सदर धरण आता पावसामुळे चांगलेच भरले असून हे धरण पाहण्यासाठी पर्यटकांची पावले तिकडे वळत आहेत.सिरोंचा तालुका व तेलंगणा राज्याची सीमारेषा विभाजीत करणाऱ्या गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने शेकडो रुपये खर्चून धरण बांधले. या धरणाचे २१ जून रोजी लोकार्पण करण्यात आले. अंकिसा व मोहला टेकडा या गावांचे स्मशानघाट गोदावरी नदीजवळ आहेत. तसेच या ठिकाणी समक्का सारक्काची जत्रा भरते.आदिवासी समाजातील नागरिकही गंगास्नानासाठी गोदावरी नदी पात्रात जातात. मात्र मेडिगड्डा बॅरेजचे पाणी जमा झाल्याने वाट काढताना अडचण जाणार आहे. धरणाचे पाणी अडविल्याने गोदावरीचे पात्र अथांग सागराप्रमाणे दिसत आहे. हे नयनरम्य दृश्य बघण्यासाठी तेलंगणा व सिरोंचा, अहेरी तालुक्यातील अनेक पर्यटक मेडिगड्डा धरणाला भेट देत आहेत.गोदावरी नदी महाराष्ट्र व तेलंगणाची विभाजक आहे. त्यामुळे या नदीच्या पाण्यावर दोन्ही राज्यांचा हक्क आहे. मात्र महाराष्ट्र शासनाने योग्य ती पावले उचलली नसल्याने या पाण्याचा संपूर्ण लाभ तेलंगणा होत आहे.महाराष्ट्रातील गावांना मात्र केवळ अडचणींचा सामना करावा लागणार आहे. महाराष्ट्राचे शासन मात्र टोकावर असलेल्या आदिवासी नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.धरणाला लावले आहेत एकूण ८४ दरवाजेगोदावरीचे विस्तीर्ण पात्र अडवून धरण बांधण्यात आले आहे. नाशिक येथील त्र्येंबकेश्वर हे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. पूर्ण महाराष्ट्र पालथा घालत ही नदी सिरोंचापर्यंत येते. सिरोंचाजवळ गोदावरीचे विस्तीर्ण पात्र आहे. त्यामुळे मेडिगड्डा धरण सुध्दा आकाराने मोठे आहे. या धरणाला एकूण ८४ दरवाजे बसविण्यात आले आहेत. या धरणाचे पाणी २०० किमी अंतरावर असलेल्या हैदराबादपर्यंत पोहोचविले जाते. या पाण्यामुळे तेलंगणा राज्य सुजलाम सुफलाम होणार आहे.

टॅग्स :Damधरणdam tourismधरण पर्यटन