शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
2
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
7
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
8
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
11
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
12
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
13
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
14
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
15
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
16
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
17
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
18
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
19
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
20
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक दिवे पुन्हा सुरू होणार

By admin | Updated: March 5, 2017 01:22 IST

मागील तीन वर्षांपासून बंद असलेले शहरातील इंदिरा गांधी चौकातील वाहतूक दिवे दुरूस्त झाले असून

दिव्यांची दुरूस्ती पूर्ण: मागील तीन वर्षांपासून होते बंद गडचिरोली : मागील तीन वर्षांपासून बंद असलेले शहरातील इंदिरा गांधी चौकातील वाहतूक दिवे दुरूस्त झाले असून या दिव्यांची शनिवारी ११.३० वाजता चाचणी घेण्यात आली असता दिवे सुरू झाले; मात्र या दिव्यांमध्ये टाईम सेटिंग नसल्याने सदर टाईम सेटिंग करून वाहतूक दिवे सोमवारी पूर्ववत सुरू केले जाणार आहेत. बल्लारपूर पेपरमिलच्या सीएसआर निधीतून इंदिरा गांधी चौकात पाच वर्षांपूर्वी वाहतूक दिवे बसविण्यात आले होते. मात्र त्यानंतर वाहतूक दिवे अगदी दीड ते दोन वर्षातच बंद पडले. तेव्हापासून सदर वाहतूक दिवे जवळपास तीन वर्षांपासून बंदच होते. सदर वाहतूक दिवे दुरूस्त करण्यासाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी नगर परिषदेने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षात नगरोत्थान योजनेतून २ लाख ४१ हजार ४४० रूपये मंजूर केले. या निधीतून नगर परिषदेने वाहतूक दिव्यांच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले. मागील एक महिन्यापासून सदर काम केले जात होते. चारही वाहतूक दिव्यांसाठी भूमिगत वायर टाकण्यात आले आहेत. या वायरमध्ये बिघाड निर्माण झाला होता तर काही वायर तुटले होते. चारही बाजुला खड्डे खोदून वायर दुरूस्त करण्यात आले. त्यानंतर सदर वाहतूक दिवे शनिवारी सुरू केले. चारही मार्गावरील वाहतूक दिवे सुरू झाले. मात्र सदर वाहतूक दिव्यांमध्ये टाईम सेटिंगची समस्या निर्माण झाली आहे. केवळ १५ सेकंदाच्या अंतराने वाहतूक दिवे चालूबंद होतात. १५ सेकंद हा अतिशय कमी वेळ आहे. त्यामुळे यामध्ये बदल करून किमान दोन ते तीन मिनिटांचा टाईम सेट करावा लागणार आहे. यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्याला बोलविले जाणार असून सोमवारपासून सदर वाहतूक दिवे पूर्ववत सुरू होतील, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. (नगर प्रतिनिधी)