शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ट्रॅक्टरचे गाव विसोरा!

By admin | Updated: September 8, 2014 01:20 IST

आधुनिक तंत्रज्ञानाच्या झंझावाताने मानवी जीवनाची दिशा पार पालटून गेली. १९व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच नवनवीन शोधातून संशोधकांनी मानवाला उंचच उंच प्रगतीचे पंख दिले.

अतुल बुराडे विसोराआधुनिक तंत्रज्ञानाच्या झंझावाताने मानवी जीवनाची दिशा पार पालटून गेली. १९व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच नवनवीन शोधातून संशोधकांनी मानवाला उंचच उंच प्रगतीचे पंख दिले. यात कृषीक्षेत्रसुद्धा मागे राहिले नाही. परंतु खरी क्रांती झाली ती ट्रॅक्टरच्या शोधाने. पन्नास साठ वषापूर्वी जिल्ह्यात एखादाच टॅ्रक्टर होता. मात्र आज परिस्थिती पूर्णत: बदलली असून एकट्या देसाईगंज तालुक्यातील विसोरा गावात १०५ ट्रॅक्टर आहेत. आधीच श्रीमंतांचा गाव अशी ख्यातीप्राप्त विसोरा गावाची आता ट्रॅक्टरांचा गाव अशी नवी ओळख निर्माण झाली आहे.ट्रॅक्टरचा शोध कुणी लावला याबद्दल माहिती काढली असता अनेक शास्त्रज्ञांची नावे समोर येतात त्यात निकोलस कुग्नोट यांचे नाव पहिल्यांदा लिहिता येईल. जगातील पहिला ट्रक्टर भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर येथील शेतकरी सरदार सर जोगींदर सिंग यांनी १९१४ साली सर्वप्रथम वापर केला. विसोरा येथे सर्वप्रथम वासुदेव पाटील नाकाडे यांनी १९५६ साली जर्मन कंपनीचा बुलडॉग लांजर नावाचा टॅ्रक्टर आणला. तर दुसऱ्याच वर्षी म्हणजे १९५७ साली रामचंद्र नाकाडे, रेशीम नाकाडे या दोघांनी रशियन ट्रॅक्टर घेतला. वासुदेव पाटील नाकाडे यांनीच १९६०-६२ च्या दरम्यान जॉन डियर लांजर टॅ्रक्टर विकत घेतला, कमी हॉर्स पॉंवरमूळे त्याचे बोदबोद्या हे नाव पडले. त्यामुळे हा ट्रक्टर सर्वात जास्त काळ लक्षात राहिला. १९६५ साली झेटर तर १८ मार्च १९७५ या दिवशी आयशर हा ट्रक्टर आत्माराम नाकाडे यांनी खरेदी केला. ६० च्या दशकात दळणवळणाच्या सुविधाच नसल्याने बाल गोपालांसह वयस्कांनाही वाहनांबद्दल एक वेगळेच आकर्षण होते. त्यामुळे गावातील रस्त्यावरून ट्रॅक्टर धावू लागताच लहान पोरांसह मोठ्यांचीही ट्रक्टर पाहण्यासाठी तौबा गर्दी उसळायची, अशी माहिती विसोरा गावातील जेष्ठ प्रतिष्टीत नागरिक रामचंद्र पाटील नाकाडे यांनी दिली. टॅ्रक्टरांच्या संख्येने गावात शंभरी ओलांडली त्यामुळे गावातील शेती विकसित होण्यास मदत होत आहे, असे मत गावचे सरपंच प्रमोद बुद्धे व तलाठी बोंडे यांनी व्यक्त केले. विसोरा गावची लोकसंख्या ४ हजार ६०४ असून येथील ९८८ कुटुंबापैकी अनेकांकडे ट्रॅक्टर आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांकडे एक ते दोन ट्रॅक्टर असल्यामुळे या ट्रॅक्टरची देखभाल, दुरूस्ती करण्याचे काम शेतकरी स्वत: करीत आहेत. अनेकजण स्वत: ट्रॅक्टर चालवित आहेत.विसोरा येथे १९५६ मध्ये सर्वप्रथम ७ हजार रुपयात ट्रॅक्टर खरेदी करुन आणण्यात आले. तेव्हापासूनच शेतातील नांगरणी, वखरणी, पेरणी, मळणी वगैरे कामे ट्रॅक्टरद्वारे केली जात आहेत. यामुळे शेती आणि शेतकरी यांची मजूर, पारंपरिक साधनांमुळे होणारी परवड दूर झाली तसेच उत्पादनात एकूणच शेती व्यवसायात आमूलाग्र बदल झाला, अशी प्रतिक्रीया ट्रॅक्टरधारक शेतकरी देविदास बुराडे यांनी व्यक्त केली.