हत्या प्रकरणात आणखी तीन आराेपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 05:00 IST2021-07-08T05:00:00+5:302021-07-08T05:00:31+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : शहराच्या फुले वाॅर्डात २४ जून राेजी झालेल्या दुर्याेधन रायपुरे यांच्या हत्या प्रकरणात आणखी तीन ...

Three more accused arrested in murder case | हत्या प्रकरणात आणखी तीन आराेपींना अटक

हत्या प्रकरणात आणखी तीन आराेपींना अटक

ठळक मुद्देचारही आराेपी गाेंदियाचे : फुले वाॅर्डातील प्रकरणाच्या तपासाला गती

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : शहराच्या फुले वाॅर्डात २४ जून राेजी झालेल्या दुर्याेधन रायपुरे यांच्या हत्या प्रकरणात आणखी तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. यातील पहिल्या आरोपीला ३ जुलै राेजी अटक केली होती. त्याला पाेलिसी खाक्या दाखविल्यानंतर बऱ्याच गाेष्टी उघडकीस आल्या. 
तीन आराेपींना ६ जुलै राेजी मंगळवारी अटक केली. बुधवारी त्यांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १३ जुलैपर्यंत सात दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे. या तीन आराेपींमध्ये प्रसन्ना रेड्डी (२४), अविनाश मत्ते (२६), धनंजय उके (३१) सर्व राहणार गाेंदिया यांचा समावेश आहे. यापूर्वी म्हणजे ३ जुलै राेजी अमन कालसर्पे (१८) याला पाेलिसांनी अटक केली हाेती. ताे ९ जुलैपर्यंत पाेलीस काेठडीत आहे. 
या चारही आराेपींवर भादंविचे कलम ३०२, २०१ अन्वये गडचिराेली पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा कसून तपास गडचिराेली पाेलीस करीत आहेत.

राजकीय द्वेषातून हत्या?
सामाजिक कार्यकर्ते दुर्याेधन रायपुरे यांच्या हत्येप्रकरणी गडचिराेली पाेलिसांनी गतीने तपास करून चार आराेपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे हे चारही आराेपी गाेंदिया येथील आहेत. त्यांची पाेलिसांनी कसून विचारपूस केली. दरम्यान, राजकीय द्वेषातून  फुले वाॅर्डातील हे हत्याकांड घडल्याचा संशय बळावला आहे. तसे संकेतही पाेलिसांनी दिले आहेत. मात्र ठाेस पुरावा हाती लागेपर्यंत कोणाला आराेपी करता येणार नाही, असे पाेलिसांनी सांगितले. या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार आराेपी अद्यापही फरार असून आराेपींची संख्या वाढू शकते, असे पोलिसांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले. या हत्याकांडामुळे वाॅर्डातील समाजमन ढवळून निघाले हाेते. 

 

Web Title: Three more accused arrested in murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस