शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ३५ मजुरांचा शेकडो किमीचा पायीच प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 05:00 IST

प्रवासादरम्यान आरमोरी येथे पोहोचल्यानंतर युवारंगच्या सदस्यांनी दिलेला अल्पोपहार घेऊन ते पुन्हा पुढच्या प्रवासाला निघाले. गोंदिया जिल्ह्यातील अनेक मजूर आपले कुटुंब घेऊन दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मिरची तोडणीच्या कामासाठी तेलंगणा राज्यात गेले. गोंदियाच्या सडक-अर्जुनी तालुक्यातील गोंगली येथील ३५ मजूर मिरची तोडण्यासाठी तेलंगणा राज्यात गेले होते.

ठळक मुद्देतेलंगणा ते गोंदिया प्रवास : मिरची तोडणीच्या कामासाठी गेले होते तेलंगणात

महेंद्र रामटेके ।लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर वाहतुकीची साधने बंद झाली. त्यामुळे कामाच्या शोधात गेलेले मजूर त्याच ठिकाणी अडकल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेलेले गोंदिया जिल्ह्याच्या गोंगली येथील ३५ पुरूष व महिला मजुरांनी डोक्यावर सामानाचे गाठोडे घेऊन भर उन्हात तेलंगणा ते गोंगली (जि.गोंदिया) असा शेकडो किमीचा पायी प्रवास केल्याची बाब २९ मार्चला निदर्शनास आली.प्रवासादरम्यान आरमोरी येथे पोहोचल्यानंतर युवारंगच्या सदस्यांनी दिलेला अल्पोपहार घेऊन ते पुन्हा पुढच्या प्रवासाला निघाले. गोंदिया जिल्ह्यातील अनेक मजूर आपले कुटुंब घेऊन दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मिरची तोडणीच्या कामासाठी तेलंगणा राज्यात गेले. गोंदियाच्या सडक-अर्जुनी तालुक्यातील गोंगली येथील ३५ मजूर मिरची तोडण्यासाठी तेलंगणा राज्यात गेले होते. मिरची तोडाईचे काम सुरू असताना जगात कोरोनाचे संकट घोंगवायला सुरूवात झाली आणि हे संकट टाळण्यासाठी खबरदारी म्हणून देशात लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी मिरची तोडाईचा रोजगार बंद झाला. हाताला मिळणारे कामही थांबले. लॉकडाऊनमुळे राज्यातील प्रवासीह वाहतूकही बंद झाली. १४ एप्रिलपर्यंत तीन आठवडे संचारबंदी असल्याने एवढे दिवस रिकामे बसून खाण्यापेक्षा आपल्या गावाला गेलेले बर, असा निर्णय घेऊन ३५ मजूर तेलंगणा राज्यातून २५ मार्चला पायीच या प्रवासाला निघाले. डोक्यावर सामानाचे गाठोळे आणि कडाक्याच्या उन्हात तेलंगणा ते गोंदिया असा प्रवास सुरू झाला. दिवसभर प्रवास करायचा आणि सायंकाळ झाली तर मुक्काम करायचा. पुन्हा सकाळी प्रवासाला सुरूवात करायची, अशी त्यांची दिनचर्या.तेलंगणा राज्यातून पायी निघालेले हे ३५ मजूर शेकडो किमीचा प्रवास करीत २९ मार्चला आरमोरीत पोहोचले. ही बाब युवारंगच्या कार्यकर्त्यांना कळली. त्यांनी या मजुरांसाठी पिण्याचे पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था केली. थोडावेळ थांबल्यानंतर त्यांनी पुन्हा गोंदियासाठी प्रवासाला सुरूवात केली. ‘त्या’ ३५ मजुरांचा शेकडो किमीचा पायीचा प्रवास थक्क करणारा होता.कोरोनाच्या संकटामुळे रोजीरोटीच्या शोेधात गेलेल्या मजुरांवर पायी प्रवास करण्याची नामुष्की ओढावली. अद्यापही चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो मजूर तेलंगणात अडकून पडले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याLabourकामगार