शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पेसा कायद्यावर विचारमंथन

By admin | Updated: October 11, 2014 23:06 IST

सुशिक्षित बेरोजगार संघटना जिल्हा गडचिरोलीच्यावतीने आज शनिवारला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास येथील इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहात ‘सर्व उमेदवार एकाच मंचावर’

चर्चासत्र : गैरआदिवासींच्या पाठीशी राहण्याचे उमेदवारांचे अभिवचनगडचिरोली : सुशिक्षित बेरोजगार संघटना जिल्हा गडचिरोलीच्यावतीने आज शनिवारला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास येथील इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहात ‘सर्व उमेदवार एकाच मंचावर’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात उपस्थित सर्वच उमेदवारांनी राज्यपालाच्या पेसा कायद्याबाबतच्या अधिसुचनेमध्ये शिथिलता करून गैर आदिवासींना न्याय देण्याची भूमिका स्पष्ट केली. या चर्चासत्राला गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसच्या उमेदवार सगुणा तलांडी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार भाग्यश्री आत्राम, भाजपचे उमेदवार डॉ. देवराव होळी, शिवसेनेचे उमेदवार केसरी उसेंडी, भारिप बमसच्या उमेदवार कुसूम अलाम, मनसेच्या उमेदवार रंजीता कोडाप, आॅल इंडिया फारवर्ड ब्लॉकचे उमेदवार नारायण जांभुळे, आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डॉ. देवीदास मडावी तसेच अपक्ष उमेदवार सुनंदा आतला आदी ९ उमेदवार उपस्थित होते. यावेळी सुशिक्षित बेरोजगार संघटनेच्यावतीने महामहिम राज्यपालांनी काढलेले ९ जून २०१४ रोजीची नोकरीविषयक अधिसूचना, जिल्ह्यातील ओबीसी, एससी, एन. टी., एसबीसी यांचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत करणे, जिल्हा निवड मंडळ स्थापन करणे, ओबीसी, एन. टी., वि. जे., एस. बी. सी. विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीची उत्पन्न मर्यादा ४.५ लाखावरून ६ लाखापर्यंत करणे, जिल्ह्यातील बेरोजगारी कमी करणे आदी मुद्दे ठेवण्यात आले होते. उपस्थित नवही उमेदवारांनी या पाचही मुद्द्याच्या अनुषंगाने आपली भूमिका यावेळी स्पष्ट केली. या चर्चासत्राचे संघटनेच्यावतीने ध्वनीचित्रीकरणही करण्यात आले. यामुळे उमेदवारांनी बिगर आदिवासींच्या या महत्वाच्या पाच प्रश्नांवर स्पष्ट केलेलीे भूमिका निवडणुकीच्या निकालानंतर जिल्हाभरातील जनतेपुढे मांडणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. या चर्चासत्राला ओबीसी व बिगर आदिवासी नागरिक उपस्थित होते. यावेळी काही उमेदवारांनी आरक्षण कमी केल्याच्या मुद्द्यांवर विविध राजकीय नेत्यांवर टिका करण्याचा प्रयत्न केला. मात्र आयोजकांनी सदर व्यासपीठ राजकीय नसल्याचे सांगून उमेदवारांच्या टिकेच्या वक्त व्याला पूर्ण विराम दिला.पेसा कायद्याच्या विरोधात बिगर आदिवासी संघटनेच्यावतीने मोठे आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे साऱ्याच राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष आहे. मात्र पेसा कायद्याच्या चर्चासत्राला आज गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील १३ पैकी ९ उमेदवारांनी हजेरी लावली. ४ उमेदवारांनी या चर्चासत्राकडे पाठ फिरविली. (स्थानिक प्रतिनिधी)