शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन अध्यापन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:01 IST

राज्यात कोरोना विषाणूचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्था शासनाच्या निर्देशानुसार बंद आहेत. मात्र शासन निर्देशानुसार शैक्षणिक प्रथम वर्ष सोडून उर्वरित अभ्यासक्रम १ ऑगस्ट पासून प्रथम वर्ष १ सप्टेंबर २०२० पासून सुरू होणार आहे. राज्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या लक्षात घेता यात सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे.

ठळक मुद्देकोरोनाबाबत खबरदारी : नवीन शैक्षणिक सत्रात ऑनलाईन प्रवेशाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नवीन शैक्षणिक सत्र तोंडावर असताना देशभरासह राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. अशास्थितीत नियोजित तारखेनुसार विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता कमी आहे. या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंदर्भात कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन अध्ययन-अध्यापन प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.
राज्यात कोरोना विषाणूचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्था शासनाच्या निर्देशानुसार बंद आहेत. मात्र शासन निर्देशानुसार शैक्षणिक प्रथम वर्ष सोडून उर्वरित अभ्यासक्रम १ ऑगस्ट पासून प्रथम वर्ष १ सप्टेंबर २०२० पासून सुरू होणार आहे. राज्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या लक्षात घेता यात सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव १०० टक्के नष्ट होईल, हे सांगणे कठिण आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे नवीन शैक्षणिक सत्र १५ जूनपासून सुरू होत आहे. या सत्रामध्ये अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू होणे आवश्यक आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन अध्ययन व अध्यापन प्रक्रियेसंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यपालांनीसुद्धा विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रवेशाबाबत आदेश निर्गमित केले आहेत. कोरोना विषाणूच्या संकटात महाविद्यालये सुरू करणे धोक्याचे आहे. तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन निकालानंतर वरिष्ठ महाविद्यालयीन पातळीवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी योग्य तयारी करणे आवश्यक आहे. नवीन प्रवेश प्रक्रियेदरम्यान महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी उसळू शकते. याद्वारे फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नवीन शैक्षणिक सत्रात प्रथम वर्षातील महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन घ्यावी लागण्याची शक्यता आहे. त्यानुसार गोंडवाना विद्यापीठातर्फे संलग्नित महाविद्यालयांमध्ये आॅनलाईन अध्ययन-अध्यापन प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.

१२ ला प्राचार्यांची सभा
२०२०-२१ या नवीन शैक्षणिक सत्रातील शैक्षणिक योजना आखण्यासाठी शुक्रवार १२ जून रोजी सकाळी ११ वाजता गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित प्राचार्य तसेच विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक विभागाच्या प्रमुखांची सभा ऑनलाईन प्लॅटफार्मवर आयोजित करण्यात आली आहे. या सभेमध्ये तंत्रज्ञान प्लॅटफार्मची निर्मिती, अध्यापनशास्त्र मार्गदर्शक तत्त्वे, आकर्षक व रंजक शैक्षणिक व्हिडिओ, स्वतंत्र व तत्सम प्लॅटफार्मवरील शैक्षणिक साहित्य तसेच सद्य:स्थितीतील अभ्यासक्रमाशी मॅपिंग करणे, विद्यार्थ्यांना क्रेडिटसाठी लॅब तयार करून देणे, चर्चा करून आराखडा तयार करणे, आॅनलाईन प्रवेश प्रक्रीया आचार्य पदवीकरिता ऑनलाईन मौखिक परीक्षा आदी विषयांवर सभेत चर्चा होणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षण