शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गुण संपादनापेक्षा ज्ञान संपादनाकडे कल वाढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 06:00 IST

येथील गोंडवाना विद्यापीठात सुरू असलेल्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०१९’मध्ये बुधवारी ‘व्हिजन २०३०’ या विषयावरील वर्क्तृत्व स्पर्धेत १७ विद्यापीठांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेत आपल्या स्वप्नातील पुढील १० वर्षातील भारताची कल्पनाच मांडली. यात सध्या देशापुढे असलेल्या आव्हानांवर प्रकाश टाकण्यासोबतच त्या आव्हानांवर मात करून पुढे जाण्याची आशाही व्यक्त करण्यात आली.

ठळक मुद्दे‘व्हिजन २०३०’ : वर्क्तृत्व स्पर्धेत नव्या पिढीकडून अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अलीकडे सर्वजण ज्ञान संपादनापेक्षा गुण संपादनाला अधिक महत्त्व देत आहेत. पण पुढील १० दहा वर्षात हे चित्र बदलणे गरजेचे आहे. गुण संपादनापेक्षा ज्ञान संपादनाकडे नवीन पिढीचा कल वाढला पाहीजे, त्यातूनच भारत देश अधिक समृद्ध होईल, असा सूर अनेक विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी वर्क्तृत्व स्पर्धेतून व्यक्त केला.येथील गोंडवाना विद्यापीठात सुरू असलेल्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०१९’मध्ये बुधवारी ‘व्हिजन २०३०’ या विषयावरील वर्क्तृत्व स्पर्धेत १७ विद्यापीठांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेत आपल्या स्वप्नातील पुढील १० वर्षातील भारताची कल्पनाच मांडली. यात सध्या देशापुढे असलेल्या आव्हानांवर प्रकाश टाकण्यासोबतच त्या आव्हानांवर मात करून पुढे जाण्याची आशाही व्यक्त करण्यात आली. केवळ सैन्यबळ वाढल्याने आपण महासत्ता होणार नाही तर सांस्कृतिकदृष्ट्याही संपन्न व्हायला पाहीजे. आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक दर्जा व उंची वाढायला हवी अशी अपेक्षाही अनेकांनी व्यक्त केली. या विद्यार्थ्यांनी इंग्रजी आणि मराठीतून आपले विचार मांडले.परीक्षक म्हणून डॉ.अरुण पाटील (नागपूर), डॉ.मंजिरी वैद्य (मुंबई) आणि प्रा.चंद्रशेखर मलकमपट्टे (उद्गीर) यांनी जबाबदारी सांभाळली.शिबिरात ३२ विद्यार्थ्यांनी केले रक्तदानइंद्रधनुष्य-२०१९ चे औचित्य साधून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने विद्यापीठ परिसरात बुधवारी रक्त तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ३२ विद्यार्थ्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. शिबिराचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर यांनी केले. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.चंद्रशेखर भुसारी, कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले, डॉ.प्रिया गेडाम आदी उपस्थित होते. गुरूवारीही पुन्हा शिबिर शिबिर होणार आहे. शिबिराच्या यशस्वीतेसाठी रुग्णालयात रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.मुकूंद धबाडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ नरेश कंदीकुरवार, मुरलीधर पेद्दीवार, सतीश तडकलावार, जीवन गेडाम यांनी सहकार्य केले.

टॅग्स :universityविद्यापीठ