शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विहिरींच्या बोअरसाठी निधीची तरतूद नाही

By admin | Updated: July 28, 2014 23:31 IST

जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राची भरभराट होऊन शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होण्यासाठी शासनस्तरावर अनेक योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. मात्र गडचिरोली जिल्हा परिषदेच्या पुनर्विनियोजन

गडचिरोली : जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राची भरभराट होऊन शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होण्यासाठी शासनस्तरावर अनेक योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. मात्र गडचिरोली जिल्हा परिषदेच्या पुनर्विनियोजन अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या विहिरीच्या पाण्याची पातळी वाढविण्यासाठी इनरवेल बोअरकरीता अनुदानाची मुळीच तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे सिंचन विहिरीच्या पाण्याची पातळी वाढविण्यास शेतकऱ्यांपुढे अडचण निर्माण झाली आहे. कृषी योजनांवर जि.प.च्या अर्थसंकल्पात निधीची पुरेशी तरतूद नसल्याने शेतकऱ्यांवर वक्रदृष्टी असल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेचा कृषी विभाग व कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांच्या लाभासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. कृषी विभागाच्या सहकाऱ्यातून जिल्ह्यातील ३५ शेतकरी गटांनी यंदाच्या खरीप हंगामापासून यांत्रिकीकरणाची कास धरली आहे. कृषी विभागामार्फत ९० टक्के अनुदानावर शेतकरी गटांना भातरोवणीसाठी ५ यंत्र वितरित करण्यात आले आहे. यंत्राच्या माध्यमातून दुर्गम भागातील शेतकऱ्यांनीही भात रोवणीचे काम जोमात सुरू केले आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने दोन वर्षापूर्वी शेतकऱ्यांना पीव्हीसी, एचडीपीई पाईप ५० टक्के अनुदानावर वाटप करण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली होती. शेतकऱ्यांना शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी ५० टक्के अनुदानावर ताडपत्रांचे वाटप करण्याची योजनाही सुरू करण्यात आली होती. मात्र यंदाच्या जि.प.च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर ताडपत्रांचे वाटप करण्यासाठी केवळ १ हजार रूपयाची तरतूद केली असल्याचे दिसून येते. तसेच सिंचन विहिरीच्या इनरवेल बोअरकरीता काहीच तरतूद करण्यात आली नाही. तसेच पीव्हीसी व एचडीपीई पाईप वितरणाच्या योजनेसाठी पुनर्विनियोजन अर्थसंकल्प केवळ ५ लाख रूपयाची तरतूद करण्यात आली आहे. सदर तरतूद अत्यल्प असल्याने अनेक गरजू, गरीब शेतकरी पाईप मिळण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात निधीची तरतूद नसल्याने यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर ताडपत्रीचे वितरणही करणे कठीण आहे. अर्थसंकल्पातील तरतूद पाहिल्यानंतर शेतकऱ्यांवर वक्रदृष्टी असल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी)