शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

डुकरांच्या नासाडीची नुकसानभरपाई नाही

By admin | Updated: September 9, 2016 01:06 IST

येथील गावालगत असलेल्या ऐतिहासिक किल्ला सध्या झाडाझुडुपांनी वेढलेला आहे आणि किल्ला परिसरातील दाट झाडीत रानडुकरांचे कळप वास्तव्याला असतात.

गतवर्षीचे प्रस्ताव पडूनच : वैरागड किल्ल्यात कळप वास्तव्याला, पिकांची प्रचंड हानीवैरागड : येथील गावालगत असलेल्या ऐतिहासिक किल्ला सध्या झाडाझुडुपांनी वेढलेला आहे आणि किल्ला परिसरातील दाट झाडीत रानडुकरांचे कळप वास्तव्याला असतात. दिवसभर किल्ल्यात आश्रयाला असलेले रानडुकरे रात्री किल्ल्यालगत असलेल्या शेतातील खरीपाच्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करतात. परंतु याकडे वनविभागाचे दुर्लक्ष असून सन २०१५ मध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाईही अद्याप करण्यात आलेली नाही, अशी माहिती मिळाली आहे.सध्या खरीपाचे धान व तूर पीक ऐन बहरात आले आहे. त्या पिकांची नासाडी सध्या चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकरी हैराण झाला असून वन विभागाने रानडुकराच्या बंदोबस्तासाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. मागील वर्षी आॅक्टोबर २०१५ मध्ये रानडुकरांमुळे झालेल्या धानाची नुकसानभरपाई मिळालेली नाही. म्हणून वन विभागाकडे रितसर अर्ज करण्यात आला. मात्र संबंधित शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. याबाबत वनपाल, वनरक्षक यांना विचारणा केली असता, अर्जात त्रूटी असल्याचे सांगितले. राज्याच्या वनमंत्र्यांनी जंगली श्वापदांकडून खरोखरच हानी झाली असेल तर त्या संबंधित शेतकऱ्यांना १७ दिवसांत नुकसान भरपाई देण्यात यावी, असे आदेश वन विभागाला दिले आहे. मात्र वन विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत निष्काळजीपणा करीत असल्याची तक्रार उपवनसंरक्षक वडसा यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यानंतरही नुकसानभरपाई देण्याच्या कामाला वेग आला नाही. तक्रार केल्यानंतर वनकर्मचारी पंचनामा करण्यास सुद्धा संबंधित ठिकाणी जात नसल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. (वार्ताहर)आठ महिन्यांत चारवेळा प्रस्ताव वापसवन्य प्राण्यांकडून जी हानी होते, त्या तोकड्या मदतीसाठी लांब प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यातही वन विभागाच्या चुकीच्या माहितीमुळे वैरागड येथील एका शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव आठ महिन्यात चारवेळा परत आला.