शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

११८ महाविद्यालयांत नियमित प्राचार्य नाही

By admin | Updated: October 21, 2014 22:50 IST

गोंडवाना विद्यापीठाच्या वसतिगृह व अन्य इमारतीसाठी ४० एकर जागा मंजूर झाली आहे. या जागेवर बांधकाम करण्यासाठी निधीही मिळाला आहे. मात्र सदर जागा शेतकऱ्यांची असल्यामुळे हे प्रकरण

विद्यापीठाला ४० एकर जागा मिळाली : प्रभारी कुलगुरूंची पत्रकार परिषदेत माहितीगडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या वसतिगृह व अन्य इमारतीसाठी ४० एकर जागा मंजूर झाली आहे. या जागेवर बांधकाम करण्यासाठी निधीही मिळाला आहे. मात्र सदर जागा शेतकऱ्यांची असल्यामुळे हे प्रकरण उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहे. मंजूर झालेली ४० एकर जागा विद्यापीठ प्रशासनाला हस्तांतरीत व्हायची आहे. या जागेवर मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्यात येणार असून पुढील सत्रांपासून १०० प्रवेश क्षमतेचे हे दोनही वसतिगृह सुरू होणार आहेत. तसेच गोंडवाना विद्यापीठांतर्गत एकूण २३१ महाविद्यालयांपैकी ११८ महाविद्यालयात नियमित प्राचार्य नाहीत, अशा महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली असल्याची माहिती गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेत माहिती देतांना प्रभारी कुलगुरू डॉ. दीक्षित म्हणाले, आपण विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी रूजू झाल्यापासून महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व प्राचार्य यांच्याशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमावर भर दिला आहे. एकमेकांशी संवाद साधल्यानेच उच्च शिक्षणातील सर्व घटकांच्या अडीअडचणी निदर्शनास येतात. या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.दिवाळीनंतर ४ ते ५ सुसंवाद शिबिर घेण्यात येणार असून एका शिबिरात एकाचवेळी १०० प्राचार्य, प्राध्यापक व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत चर्चा घडून येणार आहे. गोंडवाना विद्यापीठाला उच्च दर्जाचे विद्यापीठ बनविण्याचे आपले ध्येय असून विद्यापीठाच्या विकासाला चालना देण्यासाठी अनेक सुधारणांची गरज आहे, असेही डॉ. दीक्षित यावेळी म्हणाले. सर्व विद्याशाखांच्या सेमिस्टर पद्धतीच्या परीक्षांचा निकाल वेळेवर घोषित करण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही ते यावेळी म्हणाले. विशेष म्हणजे आता प्रत्येक विद्यार्थ्यांला त्यांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिकांची झेरॉक्सही देण्यात येणार आहे. गोंडवाना विद्यापीठात प्रशिक्षित कर्मचारी कमी आहेत. सध्या उपलब्ध कर्मचाऱ्यांकडूनच काम करून घेण्यावर भर दिल्या जात आहे. आपण १० टक्के परीक्षा शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठातील विविध प्राधिकरणांच्या सदस्यांची तसेच सिनेट सदस्यांची निवडणूक लवकरच घेण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही डॉ. दीक्षित यावेळी म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)