शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

१५ जवानांच्या हत्येचा सूत्रधार,१ कोटी इनाम असलेला जहाल माओवादी प्रशांत बोसचा अखेर अंत

By संजय तिपाले | Updated: April 3, 2026 20:25 IST

झारखंडमध्ये हाय अलर्ट: पाच वर्षे तुरुंगात, उपचारादरम्यान सोडला श्वास

गडचिरोली : प्रतिबंधित सीपीआय-माओवादी संघटनेचा सर्वात मोठा रणनीतीकार, पॉलिट ब्युरो सदस्य, १५ जवानांच्या हत्येचा सूत्रधार आणि १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला जहाल माओवादी नेता प्रशांत बोस उर्फ किशन दा (८०) याचा ३ एप्रिल रोजी मृत्यू झाला. रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनामुळे माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर झारखंडसह सीमावर्ती भागात सुरक्षा हायअलर्ट जारी केला आहे. प्रशांत बोसची दंडकारण्यात मोठी दहशत होती. महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि ओडिशा अशा विविध राज्यांमध्ये झालेल्या २०० हून अधिक हिंसक घटनांमध्ये त्याचा   हात होता.​मूळचा पश्चिम बंगालचा असलेला प्रशांत बोस हा माओवादी संघटनेत महासचिव नंबाला केशव राव यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात शक्तिशाली नेता मानला जायचा. त्यास माओवाद्यांचा 'थिंक टँक' मानले जात असे. जंगलातील गनिमी काव्यापासून ते शहरी नक्षलवादाच्या जाळ्यापर्यंत सर्व महत्त्वाच्या निर्णयांत त्याची महत्त्वाची भूमिका होती.

तो सध्या सरायकेला येथील तुरुंगात न्यायालयीन कोठडीत होता. ३ एप्रिल रोजी पहाटे त्याला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. प्रकृती चिंताजनक झाल्याने सकाळी ६ वाजता कडक पोलिस बंदोबस्तात त्याला रांचीच्या 'रिम्स' रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने तातडीने उपचार सुरू केले, मात्र वाढत्या वयोमानामुळे आणि फुफ्फुसांच्या विकारांमुळे उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही. अखेर सकाळी १० च्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दिवाळीदिवशी कॅम्पवर हल्ला, १५ जवान झाले होते शहीद 

२०२१ मध्ये दिवाळीच्या दिवशी पोलिस कॅम्पवर झालेल्या हल्ल्याचा कट बोसनेच रचला होता, ज्यात १५ जवान शहीद झाले होते.​अनेक दशकांपासून सुरक्षा यंत्रणांच्या हातावर तुरी देणाऱ्या प्रशांत बोसला १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सरायकेला-खरसावा जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि माओवादी नेत्या शीला मरांडी हिलाही बेड्या ठोकल्या होत्या. अटकेच्या वेळी त्याच्यावर १ कोटीचे बक्षीस जाहीर होते. तेव्हापासून तो तुरुंगातच होता.

​सुरक्षा व्यवस्थेत वाढ

​प्रशांत बोसच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. माओवादी समर्थकांकडून हिंसक प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असल्याने नक्षलग्रस्त भागात सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. रुग्णालयात दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असून, शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maoist Leader Prashant Bose, Wanted in 15 Killings, Dies

Web Summary : Prashant Bose, a top Maoist leader with a bounty of ₹1 crore, died during treatment in Ranchi. He was a key strategist involved in over 200 violent incidents, including the killing of 15 soldiers. Security has been heightened in affected areas.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोलीChhattisgarhछत्तीसगड