शहरं
Join us  
Trending Stories
1
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
2
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
5
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
6
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
7
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
8
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
9
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
10
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
11
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
12
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
13
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
14
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
15
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
16
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
17
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
18
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
19
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
Daily Top 2Weekly Top 5

​भयानक स्फोट ! भूसुरुंग निकामी करताना स्फोटात कांकेरमध्ये तीन जवान शहीद

By संजय तिपाले | Updated: May 2, 2026 16:07 IST

एका जवानाची मृत्यूशी झुंज सुरु : माओवादमुक्तीच्या घोषणेनंतर सुरक्षा दलाला धक्का

​लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : छत्तीसगड राज्य माओवादमुक्त झाल्याच्या अधिकृत घोषणेला काही दिवस उलटत नाहीत तोच, माओवाद्यांनी पेरलेल्या आईडी निकामी करताना झालेल्या स्फोटात डीआरजीच्या (जिल्हा राखीव दल) जवानांनी आपले प्राण गमावले, तर एक जवान गंभीर जखमी आहे.  छत्तीसगडच्या कांकेर-नारायणपूर सीमावर्ती भागात २ मे रोजी हा स्फोट झाला.  माओवादमुक्तीसाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी ३१ मार्च २०२६ ची डेडलाईन दिली होती, त्यामुळे सुरक्षा दलांनी वेगाने सूत्रे फिरवून आक्रमक कारवाया केल्या, दुसऱ्या बाजूला आत्मसमर्पण योजनेद्वारे अनेक जहाल माओवादी मुख्य प्रवाहात सामील झाले. शरणागत माओवाद्यांनी दिलेल्या   माहितीनुसार, बस्तरच्या घनदाट जंगलात पेरुन ठेवलेली स्फोटके   नष्ट करण्यासाठी जिल्हा पोलिस आणि 'डीआरजी'च्या जवानांची एक विशेष तुकडी छोटेबेठिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत 'डी-माइनिंग' मोहीम राबवत होती.

उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

जवानांची तुकडी सतर्कतेने स्फोटके शोधत असतानाच एका जिवंत भूसुरुंगाचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की परिसरात मोठा थरकाप उडाला. यामध्ये चार जवान गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ हेलिकॉप्टरच्या सहाय्याने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान डीआरजी प्रभारी सुखराम वट्टी, कृष्णा कोमरा आणि संजय गढपाले यांची प्राणज्योत मालवली. परमानंद कोमरा हे या घटनेत गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

​सरकारच्या घोषणेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क

राज्य सरकारने ३१ मार्च रोजी छत्तीसगडला सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त घोषित केले होते. मात्र, माओवाद्यांनी यापूर्वी पेरून ठेवलेली ही  स्फोटके आता सुरक्षा दलांसाठी आणि जंगलात जाणाऱ्या स्थानिक आदिवासींसाठी मोठा डोकेदुखी ठरत आहेत. पोलिस अधीक्षक निखिल राखेचा यांनी घटनेला दुजोरा दिला असून, परिसरात नाकाबंदी करून अधिक कुमक तैनात करण्यात आली आहे.

यंत्रणा 'हाय अलर्ट'वर

​एकीकडे माओवादी हिंसाचार थंडावत असल्याचे चित्र असताना, दुसरीकडे अशा गुप्त स्फोटकांमुळे जवानांचे बळी जात असल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट असून सुरक्षा यंत्रणा पुन्हा एकदा 'हाय अलर्ट'वर आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Blast in Kanker: Three Soldiers Martyred Defusing Landmine

Web Summary : Three DRG soldiers were martyred and one seriously injured in a landmine explosion in Kanker, Chhattisgarh. The incident occurred during a de-mining operation. The soldiers were part of a team searching for explosives planted by Maoists. Security forces are on high alert.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीChhattisgarhछत्तीसगड