अवैधपणे मुरुम काढणाऱ्या कंपनीला तहसीलदारांकडून १.९६ कोटींचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:36 IST2021-02-13T04:36:09+5:302021-02-13T04:36:09+5:30

प्राप्त माहितीनुसार, एजीसी-आरएसबीआय कंपनीतर्फे देवेंद्र दामोधर शिंदे यांनी मौजा दर्शनी चक येथील सर्व्हे नं. ११ मधील तलावाचे ठिकाण असलेल्या ...

Tehsildar fines Rs 1.96 crore for illegally removing pimples | अवैधपणे मुरुम काढणाऱ्या कंपनीला तहसीलदारांकडून १.९६ कोटींचा दंड

अवैधपणे मुरुम काढणाऱ्या कंपनीला तहसीलदारांकडून १.९६ कोटींचा दंड

प्राप्त माहितीनुसार, एजीसी-आरएसबीआय कंपनीतर्फे देवेंद्र दामोधर शिंदे यांनी मौजा दर्शनी चक येथील सर्व्हे नं. ११ मधील तलावाचे ठिकाण असलेल्या जागेतून २६२२ ब्रास मुरुम अवैधरित्या जेसीबीने काढून वाहतूक केल्याची तक्रार येवलीच्या मंडळ अधिकाऱ्यांनी करून हे प्रकरण तहसीलदारांकडे पुढील कारवाईसाठी पंजीबद्ध केले होते. या प्रकरणात जोडलेल्या मौका पंचनाम्याचे अवलोकन केले असता त्या कंपनीतर्फे देवेंद्र शिंदे यांनी दर्शनी चक येथील गोविंदा मारोती कोठारे यांच्या सर्व्हे क्रमांक ६ आराजी ३.०५ हे.आर.पैकी ०.४० हे.आर.मधून ८ मे २०२० रोजी ५०० ब्रास मुरुम काढून वाहतूक करण्यासाठी अस्थायी परवाना काढला होता, परंतु त्या जागेतून मुरुम न काढता ९ मे २०२० रोजी शासकीय जागेतून जेसीबीच्या माध्यमातून २६२२ ब्रास मुरुम काढल्याचे दिसून आले. याप्रकरणी कंपनीने आपले म्हणणे मांडताना झालेल्या चुका अनावधानाने झाल्याचे सांगत माफी मागितली.

दरम्यान, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता, नायब तहसीलदार व उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांच्यावतीने तांत्रिक माेजणी केली असता १८५५ ब्रास मुरुमाचे उत्खनन झाल्याचे दिसून आले. मौका पंचनामा आणि तांत्रिक अभिप्रायावरून कंपनीतर्फे देवेंद्र शिंदे यांना रॉयल्टी, दंड आणि त्याची पाच पट रक्कम म्हणून १८५५ ब्रासकरिता १ लाख १७ हजार दंड ठोठावण्यात आला.

तसेच सर्व्हे क्रमांक १४२ मधून विनापरवाना १७८४ ब्रास मुरुम काढून तो राष्ट्रीय महामार्गाच्या कामात वापरल्याप्रकरणी येवलीचे तलाठी श्रीहरी गोविंदा लटारे यांच्या तक्रारीवरून आणि गावकऱ्यांच्या बयाणावरून एजीसी-आरएसबीआय कंपनीला एकूण ९६ लाख ३३ हजार ६०० रुपये दंड तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी ठोठावला.

Web Title: Tehsildar fines Rs 1.96 crore for illegally removing pimples