शाळांमध्ये कोरोनाचे नियम पाळताना विद्यार्थ्यांपुढे शिक्षकांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:54 IST2021-02-05T08:54:19+5:302021-02-05T08:54:19+5:30

शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांना वर्गात बसताना विशिष्ट अंतर ठेवूनच बसावे लागत आहे. अनेक शाळांमध्ये एका बेंचवर एकच विद्यार्थी बसत आहे. पण ...

Teachers suffocate in front of students while following corona rules in schools | शाळांमध्ये कोरोनाचे नियम पाळताना विद्यार्थ्यांपुढे शिक्षकांची दमछाक

शाळांमध्ये कोरोनाचे नियम पाळताना विद्यार्थ्यांपुढे शिक्षकांची दमछाक

शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांना वर्गात बसताना विशिष्ट अंतर ठेवूनच बसावे लागत आहे. अनेक शाळांमध्ये एका बेंचवर एकच विद्यार्थी बसत आहे. पण ग्रामीण भागात हा नियम आता पाळणे कठीण जात आहे. अनेक महिन्यानंतर एकत्रित आलेले विद्यार्थी एकमेकांशी गप्पा मारताना जवळीकता साधत आहेत. याशिवाय ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना मास्कचा खर्च करणे अशक्य होत आहे. मास्क घातला तरी तो पूर्णवेळ घालून राहताना दिसत नाहीत.

नगर परिषद व खासगी व्यवस्थापनाच्या मिळून १ हजार ७२ शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग भरविले जात आहेत. सद्य:स्थितीत ३८ हजारावर विद्यार्थी उपस्थित राहात आहेत. इयत्ता पाचवी ते आठवीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची एकूण संख्या ३ हजार ४४ आहे. यापैकी प्रत्यक्ष उपस्थिती तीन हजारांच्या आसपास आहे. एकूण ५८ हजार १७८ विद्यार्थ्यांपैकी ३८ हजार १२२ विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहत आहेत.

काेट....

आमच्या शाळेत इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू झाले आहेत. विद्यार्थी मास्क घालून शाळेत येत आहेत. एका बाकावर एक विद्यार्थी बसवून फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात आहे. काेराेना संदर्भात खबरदारी घेतली जात आहे. मात्र शिक्षकांची जबाबदारी अधिक वाढली आहे.

- कुसुम भाेयर, सहाशक शिक्षिका, वीर बाबूराव शेडमाके न.प.उच्च प्राथमिक शाळा, विसापूर

काेट....

इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले त्या दिवशीपासून काेराेनासंदर्भात आवश्यक काळजी घेण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. पण अनेक विद्यार्थी योग्य ती खबरदारी घेताना कोरोनाबाबतचे नियम विसरतात. त्यामुळे शिक्षकांची तारांबळ उडते.

- राजेंद्र घुगरे, मुख्याध्यापक, जि.प.उच्च प्राथमिक शाळा, नगरी

काेट.....

आमच्या शाळेत सुरुवातीच्या तुलनेत आता विद्यार्थी उपस्थिती वाढली आहे. काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये भीती उरली नाही. तरीसुद्धा अध्ययन व अध्यापन कार्यादरम्यान काेराेनाबाबत आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.

- प्रतिभा रामटेके, विद्याभारती कन्या शाळा, गडचिराेली

बाॅक्स.....

एकूण शाळा

१०७२

विद्यार्थी उपस्थिती

३८,१२२

शिक्षक उपस्थिती

३०००

Web Title: Teachers suffocate in front of students while following corona rules in schools