शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्ट घेणे बेतले जीवावर, नियतीचा असाही दुर्दैवी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:48 IST

घनश्याम मशाखेत्री धानोरा : बस सुटल्याने एक युवकाला लिफ्ट मागून दुचाकीवर जाणे युवतीच्या जीवावर बेतले. बुधवारी बसला ओव्हरटेक करताना ...

घनश्याम मशाखेत्री

धानोरा : बस सुटल्याने एक युवकाला लिफ्ट मागून दुचाकीवर जाणे युवतीच्या जीवावर बेतले. बुधवारी बसला ओव्हरटेक करताना धानोरा-मुरूमगाव मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या पिकअपची धडक बसून दुचाकीवरील युवक आणि युवती जखमी झाले होते. त्या युवतीचा रात्री गडचिरोली येथे रुग्णालयात मृत्यू झाला. मामिता निखिल किरंगे रा.खेडी (येरकड) असे मृत युवतीचे नाव आहे. जखमी युवकावर गडचिरोली येथे उपचार चालू आहेत.

अनेक युवक-युवती विविध प्रशिक्षण घेऊन कौशल्य प्राप्त करून स्वतःच्या पायावर उभे राहात आहेत. मामिता किरंगे ही युवती खेडी या दुर्गम भागातील असून बीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून ती धानोराच्या आयटीआय मध्ये ड्रेस मेकिंगचे प्रशिक्षण घेत होती. कोरोनामुळे सर्व शिक्षण प्रशिक्षण संस्था बंदच होत्या. १ जानेवारीपासून आयटीआय सुरू करण्यास परवानगी मिळाली. तेव्हापासून मामिता आपल्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून मिळेल त्या साधनाने खेडीवरून धानोरा येथे प्रशिक्षणाकरिता येत होती.

घरी असल्यावर घरचे व शेतीच्या कामात आई-वडिलांना मदत करायची. प्रशिक्षण संस्थेतही हसऱ्या चेहऱ्याची, मृदू स्वभावाची मामिता सर्व मुलींमध्ये परिचित होती. हसत खेळत तिचे प्रशिक्षण सुरू होते. पण २७ जानेवारीचा दिवस तिच्यासाठी काळ ठरला. नेहमीप्रमाणे आपली कामे उरकून ती आयटीआयमध्ये प्रशिक्षणासाठी हजर झाली. ४ वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे तिला घरी जाण्याचे वेध लागले होते. पण तीचा तो प्रवास जीवनातील शेवटचा प्रवास होता याची तिलाही कल्पना नव्हती.

मामिताच्या आयटीआयला ५ वाजता सुटी होते, पण कोरोनामुळे बऱ्याच बस सेवा बंद असल्याने मुरूमगाव मार्गावर सायंकाळी ४.१५ नंतर बस नाही. त्यामुळे तिने आपल्या शिक्षिकेला विनंती करून लवकर सुटी मागितली, पण काही मिनिटांच्या फरकाने तिची बस सुटली. एवढ्यात त्याच मार्गाने जाणाऱ्या एका युवकास विनंती करून तिने लिफ्ट मागितली. दुचाकीवरून वेगाने काही अंतर गेल्यास सुटलेली बस पकडता येईल असे तिला वाटले. त्यासाठी युवकाने वेगात गाडी काढली. ३ किमी अंतरावर त्यांनी बसही गाठली. बसला ओव्हरटेक करून थांबवण्यासाठी त्यांनी गाडी पुढे घेण्याचा प्रयत्न केला, पण गावाजवळील वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेही दूर फेकल्या गेले.

या आवाजाने बाजूच्या शेतात भुईमूग काढणारे मजूर मदतीला धावून गेले. रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी रुग्णालयात फोन करून माहिती दिली. दोघेही जखमींना धानोराच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले, परंतु गंभीर जखमी असल्याने डॉ.देवेंद्र सावसागडे यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना गडचिरोली येथे रेफर केले. रात्री उपचारादरम्यान मामिताचा मृत्यू झाला. सायंकाळी या मार्गावर बस उपलब्ध असती तर माझ्या मुलीचा जीव गेला नसता अशी व्यथा तिच्या पालकांनी व्यक्त केली. तिला धडक देणारे वाहन मिळेलही परंतु लाखमोलाचा जीव परत मिळणार का? अशी हळहळ गावकरी व्यक्त करत आहेत.