शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

५० टक्के कृषी वीज बिल सुटीचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:52 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : राज्य शासनाने नुकतेच कृषी धाेरण जाहीर केले आहे. यानुसार थकीत कृषी वीज बिलावर लादलेले ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : राज्य शासनाने नुकतेच कृषी धाेरण जाहीर केले आहे. यानुसार थकीत कृषी वीज बिलावर लादलेले व्याज व विलंब आकार माफ केला जाणार आहेत. थकीत बिलाच्या ५० टक्के बिलावर सूट दिली जाणार असून, केवळ ५० टक्के वीज बिल शेतकऱ्यांना भरायचे आहे. शेतकऱ्यांनी वीज बिल भरावे, असे आवाहन प्रभारी अधीक्षक अभियंता रवींद्र गाडगे यांनी केले. राज्य शासनाने कृषी धाेरण २०२० जाहीर केले आहे. या धाेरणाअंतर्गत कृषी वीज बिलाच्या थकबाकीवर विविध सवलती जाहीर केल्या आहेत. या सवलतींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, या उद्देशाने २८ जानेवारी राेजी पाेटेगाव मार्गावरील विद्युत भवन कार्यालयात शेतकरी मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन प्रभारी अधीक्षक अभियंता रवींद्र गाडगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत हाेते. कार्यक्रमाला प्रभारी उपविभागीय अभियंता प्रशांत तेलतुंबडे, सहायक अभियंता विनाेद काेल्हटवार, प्रफुल्ल पिंपळकर, संताेष रूद्रशेट्टीवार, पुरुषाेत्तम वंजारी, पुनेश्वर मेश्राम, आदी उपस्थित हाेते.

मेळाव्याला जवळपास ८० शेतकरी उपस्थित हाेते. या धाेरणाबाबत अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी जवळपासच्या महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. व्याज व विलंब शुल्क माफ केल्याने मुद्दल रकमेच्या केवळ ५० टक्के रक्कम भरायची आहे. जास्तीत जास्त शेतकरी थकीत वीज बिल भरतील, अशी अपेक्षा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.