शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
2
Top Marathi News Live Updates: देशासमोरील संकट गंभीर, पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी- शरद पवार
3
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
4
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
5
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
6
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
7
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
8
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
9
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
10
HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी मोठी बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ; परिवहन मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
11
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
12
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
13
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
14
Motorola Razr Fold भारतात लॉन्च; १.७० लाखांचा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध
15
देवास हादरलं! फटाका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, १५ जणांच्या मृत्यूची भीती; रस्त्यावर रक्ताचा सडा
16
Gomed Gemstone: राजकारणात किंवा व्यवसायात हवे मोठे पद? 'गोमेद' रत्न पालटू शकते भाग्य!
17
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
18
US Fed Reserve: केविन वॉर्श बनले अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष, आता व्याजदर कमी होणार का? महागाई रोखण्याचंही आव्हान
19
Astro Tips: श्रीमंत होण्याचे प्रबळ योग! 'या' नक्षत्रात जन्मलेले लोक शून्यातून विश्व करतात विश्व निर्माण!
20
धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाळ फुटलेल्या गावतलावाची तहसीलदारांकडून पाहणी

By admin | Updated: July 9, 2015 01:54 IST

स्थानिक चामोर्शी शहराला लागून असलेल्या पाळ फुटलेल्या गावतलावाची तहसीलदार यू. जी. वैद्य यांनी पाहणी करून पाळ दुरूस्ती,

चामोर्शी गावात : दुरूस्ती कामासाठी जि. प. सिंचन विभागाला दिले आदेश
चामोर्शी : स्थानिक चामोर्शी शहराला लागून असलेल्या पाळ फुटलेल्या गावतलावाची तहसीलदार यू. जी. वैद्य यांनी पाहणी करून पाळ दुरूस्ती, मातीकाम तसेच पाळ बांधकाम करण्याबाबत उपविभागीय अभियंता जि. प. सिंचन विभाग यांना तहसीलदारांनी निर्देश दिले. यावेळी तहसीलदार वैद्य यांच्यासमावेत गजानन भांडेकर, राहुल नैताम, नुरेश नैताम, बाबाजी चलाख, प्रमोद दुधबळे आदी उपस्थित होते.
येथील गाव तलावाच्या पाळीने आठमाही गाळदान असून कास्तरवर्ग शेताकडे जाणे-येणे करतात. परंतु सदर तलावाची पाळ फुटल्यामुळे शेताकडे रोवणीच्या हंगामाकरिता जाणे-येणे करण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते आणि तलावाची पाळ फुटल्यामुळे गावात पाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच धानाची शेतीसुद्धा बुडून राहू शकते. या परिसरात अंदाजे २०० ते २५० एकर शेतजमीन पाण्याखाली डुबून राहण्याचा धोका आहे. शेतकऱ्यांनी तहसीलदारांना १६ जून रोजी निवेदन देऊन समस्या सांगितली होती व तलावाच्या पाळीची दुरूस्ती करून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर तहसीलदारांनी उपविभागीय सिंचन अधिकारी चामोर्शी यांना सांगितले. परंतु या कार्यालयाने दुर्लक्ष केले. तहसीलदारांना निवेदन देताना शेतकरी आनंदराव सोनटक्के, गजानन भांडेकर, नीलकंठ दुधबळे, ढिवरू चलाख, दुर्योधन चलाख, सुरेश चलाख, इंद्रजीत पिपरे, दिवाकर चलाख, नीलेश सोनटक्के, रामजी चलाख, आनंदराव भांडेकर आदी उपस्थित होते.
बुधवारी तहसीलदार यू. जी. वैद्य यांनी प्रत्यक्ष तलावाची पाहणी करून उपविभागीय सिंचन अधिकाऱ्यास फुटलेली पाळ दुरूस्त करून देण्याबाबत निर्देश दिले. रोवणी हंगाम सुरू होण्याच्याआधी तलावाची फुटलेली पाळ दुरूस्ती व मातीकाम करण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पावसाळ्यापूर्वी ही पाळ दुरूस्त झाल्यास हानी टळेल. अन्यथा शेतकऱ्यांची अडचण वाढणार आहे. (शहर प्रतिनिधी)