शहरं
Join us  
Trending Stories
1
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
2
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
3
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
4
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
5
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
6
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
7
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
8
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
9
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
10
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
11
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
12
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
13
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
14
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
15
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
16
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
17
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
18
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
19
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
20
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हाधिकाऱ्यांकडून विहीर बांधकामाची पाहणी

By admin | Updated: June 7, 2015 02:05 IST

येथून जवळच असलेल्या शंकरनगर व पळसगावाला रोहयो उपजिल्हाधिकारी जयंत पिंपळगावकर यांनी भेट देऊन या दोन गावांमधील विहीर, रस्ता बांधकाम व इतर कामांची पाहणी केली.

कामाबाबत मार्गदर्शन : शंकरनगर व पळसगावला भेट
जोगीसाखरा : येथून जवळच असलेल्या शंकरनगर व पळसगावाला रोहयो उपजिल्हाधिकारी जयंत पिंपळगावकर यांनी भेट देऊन या दोन गावांमधील विहीर, रस्ता बांधकाम व इतर कामांची पाहणी केली.
शंकरनगर येथे रोहयो अंतर्गत चार सिमेंट रस्ते, विहीर बांधकाम, पांदन रस्ते, रोपवन, मजगीचे काम करण्यात आली आहेत. या सर्व कामांना पिंपळगावकर यांनी भेट देऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान अकुशल कामापेक्षा कुशल कामाची टक्केवारी जास्त असल्याचे निदर्शनास आले. अकुशल कामावर केवळ २२ मजूर काम करीत असल्याची माहिती ग्रामरोजगार सेवकाने दिली.
पळसगाव ग्रामपंचायत अंतर्गत पाथरगोटा येथील मजगीचे काम, शेततळे व विहीर बांधकामाला प्रत्यक्ष भेट दिली. नवीन कामासोबतच जुन्या प्रलंबित कामांना जास्त महत्त्व देऊन ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी त्यांच्यासोबत नरेगाचे संवर्ग विकास अधिकारी एस. पी. पडघम, तहसीलदार मनोहर वलथरे, संवर्ग विकास अधिकारी निमजे, शंकरनगरचे सरपंच सुजीत मिस्त्री, अशोक चक्रवती, जनबंधू, सुरेश शेबे, भूपती ढाली, राजू मंडल, सुबोध सरदार, तलाठी टिचकुले, पळसगावचे सरपंच मडावी, उपसरपंच बंडू दोनाडकर, सचिव उद्ध्व प्रधान, ग्राम रोजगार सेवक गणेश मातेरे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
शेतकऱ्यांनी सांगितल्या विहीर बांधकामातील अडचणी
सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी शंकरनगर येथील अनेक शेतकऱ्यांना सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. यात विहिरींचे बांधकाम सुरू आहे. मात्र बऱ्याचवेळा प्रशासनाकडून वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिल्या जात नाही. त्यामुळे अनेक विहिरींचे बांधकाम रखडले आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष घालून विहिरींचा निधी तत्काळ मंजूर करावा, अशी मागणी शंकरनगर येथील शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली.