आत्मसमर्पित माओवाद्यांच्या नसबंदी काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वी; आयुष्यात आनंदाची नवी पहाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 13:10 IST2026-03-27T13:09:08+5:302026-03-27T13:10:09+5:30

Gadchiroli : एकेकाळी हातात बंदूक घेऊन हिंसक चळवळीत स्वतःला झोकून देणाऱ्या; पण आता मुख्य प्रवाहात परतलेल्या आत्मसमर्पित माओवाद्यांच्या आयुष्यात आनंदाची नवी पहाट उजाडणार आहे.

Surrendered Maoist's vasectomy surgery successful; A new dawn of happiness in life | आत्मसमर्पित माओवाद्यांच्या नसबंदी काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वी; आयुष्यात आनंदाची नवी पहाट

Surrendered Maoist's vasectomy surgery successful; A new dawn of happiness in life

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
एकेकाळी हातात बंदूक घेऊन हिंसक चळवळीत स्वतःला झोकून देणाऱ्या; पण आता मुख्य प्रवाहात परतलेल्या आत्मसमर्पित माओवाद्यांच्या आयुष्यात आनंदाची नवी पहाट उजाडणार आहे.

माओवादी दलमध्ये असताना सक्तीने केलेल्या नसबंदीमुळे अपत्यसुखापासून वंचित असलेल्या १४ आत्मसमर्पितांवर गडचिरोली पोलिस दल आणि 'सर्च' फाउंडेशनच्यावतीने यशस्वीरीत्या 'नसबंदी रिओपनिंग' शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे त्यांच्या घरात लवकरच 'पाळणा' हलण्याची आशा पल्लवित झाली आहे.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पितांच्या पुनर्वसनासाठी 'प्रोजेक्ट संजीवनी' राबविला जात आहे. याअंतर्गत चातगाव येथील सर्च फाउंडेशनच्या माँ दंतेश्वरी रुग्णालयात २१ मार्च रोजी विशेष शिबिर घेण्यात आले. यामध्ये गडचिरोलीतील १३ आणि गोंदिया जिल्ह्यातील १, अशा एकूण १४ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मंगळवारी (दि. २४) या सर्वांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

तज्ज्ञ डॉक्टरांचा ताफा सेवेत

ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी पद्मश्री डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या लीलावती रुग्णालयातील तज्ज्ञ डॉ. श्रीरंग पुरोहित, डॉ. सुशील नेहेते, डॉ. लीना जैन आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. नागसेन साखरे व डॉ. वर्षा बारई यांच्या पथकाने अथक परिश्रम घेतले. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक एम. रमेश, कार्तिक मधीरा, गोकुल राज जी. यांच्या देखरेखीत आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी नरेंद्र पिवल व संतोष कोळी यांनी ही मोहीम यशस्वी केली.

पुनर्वसनासाठी 'लॉयड्स'मध्ये रोजगार अन् हक्काचे घर!

केवळ शस्त्रक्रियाच नव्हे, तर आत्मसमर्पितांना समाजात प्रतिष्ठा मिळावी म्हणून पोलिस दल आग्रही आहे. ७२ आत्मसमर्पितांना लॉयड्स मेटल्समध्ये प्रशिक्षण व रोजगार मिळाला आहे. चार स्वतंत्र रो-हाऊसचे बांधकाम प्रगतिपथावर असून, प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ दिला जात आहे. आधार कार्ड, रेशन कार्डपासून ते 'ऑपरेशन रोशनी'पर्यंत सर्व मदत एकाच छताखाली पुरविली जात आहे.

Web Title : आत्मसमर्पित माओवादियों की नसबंदी पलटने की सर्जरी सफल, खुशी की नई सुबह।

Web Summary : गढ़चिरौली पुलिस और सर्च फाउंडेशन ने 14 आत्मसमर्पित माओवादियों पर नसबंदी पलटने की सर्जरी सफलतापूर्वक की, जिससे मातृत्व की उम्मीद जगी। 'प्रोजेक्ट संजीवनी' के तहत यह पहल रोजगार और आवास सहित एक सम्मानजनक जीवन के लिए नए अवसर प्रदान करती है।

Web Title : Sterilization reversal successful for surrendered Maoists, new dawn of joy.

Web Summary : Gadchiroli Police and Search Foundation successfully performed sterilization reversal surgeries on 14 surrendered Maoists, offering hope for parenthood. This initiative, under 'Project Sanjeevani,' provides renewed opportunities for a dignified life, including employment and housing.